घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग अखेर भाजपकडे; नारायण राणे यांची उमेदवारी...

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग अखेर भाजपकडे; नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

Subscribe

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर करत नारायण राणे यांची उमेदवारी घोषित केली.

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर करत नारायण राणे यांची उमेदवारी घोषित केली. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. त्यामुळे आता ठाणे, नाशिक आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना आपले उमेदवार जाहीर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024 Ratnagiri-Sindhudurg finally goes to BJP Narayan Rane candidature announced)

केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार करत होते. त्यामुळे नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. अखेर आज त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेतोय. मी थांबतोय. असे ट्वीट किरण सामंत यांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या एका नेत्याने याबाबतचा निर्णय थोड्या दिवसांनी घ्यावा असे म्हटले होते. त्यापार्श्वभूमीव काल (17 मार्च) रात्रीपर्यंत आमची चर्चा सुरू होती. काल आमची बैठक ही झाली. या बैठकीला माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतर किरण सामंत यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेण्याचा आपला निर्णय ठाम ठेवल्याचे उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अचानक काय झालं? महायुती टिकण्यासाठी आमदार सुनील शेळकेंची देवाकडे प्रार्थना; वाचा सविस्तर

- Advertisement -

“काही दिवसांपूर्वी मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा धनुष्यबाणाला म्हणजे शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली होती. कारण धनुष्यबाण या मतदारसंघातील लोकांना माहिती आहे. त्यावेळी शिवसेनेकडून या मतदारसंघात किरण सामंत हेच उमेदवार होते. त्यानंतर संपूर्ण माहिती मी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली होती. त्यानंतर काल रात्री मी आणि किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये म्हणून नारायण राणे उमेदवारी जाहीर झाल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे निश्चित झाले. आमच्या कुटुंबियांशीही आम्ही चर्चा केली. त्यावेळी त्यांनीही नारायण राणे यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली”, असेही उदय सामंत म्हणाले.

विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे लढत

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे हे उद्या (19 मार्च) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नारायण यांना थोड्याच वेळात पक्षाचा एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी मोठं शक्तीप्रदर्शन करत नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता शिवसेने ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध भाजप उमेदवार नारायण राणे अशी लढत पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काश्मीर ते कन्याकुमारी…, लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या शुभेच्छा

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -