घरताज्या घडामोडीअयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद सर्वांची संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणाही केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद सर्वांची संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणाही केली. त्यानुसार, अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारण्यात येणार आहे. तसेच, या महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची अशी घोषणा केली. (Maharashtra Bhavan in Ayodhya will be named after Balasaheb Thackeray Says CM Eknath Shinde announcement)

पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “अयोध्येतील वातावरण राममय झालं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वेगळीच वलय जाणवली. राम मंदिर आमच्या अस्मितेचा विचार. राम मंदिर भारतवर्षासाठी अस्मिता. राम मंदिर हे स्वप्न बाळासाहेबांनी पहिल्यांदा पाहिले होते. हिंदुत्वाचे प्रतिक आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराचे काम इतक्या वेगाने होतंय ही आश्चर्याची गोष्ट आहे. अयोध्येत आलो हा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझे जंगी स्वागत झाले. माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे नियोजन केले होते”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत. आज भाजप शिवसेना पुन्हा सत्तेत आले आहे. त्याचा जनतेला आनंद आहे. महाराष्ट्रात जनतेने भाजप शिवसेनेला मतं दिली. मात्र, काही लोकांनी स्वार्थापोटी कौल नाकारला. सत्तेसाठी काही लोकांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला तिलांजली दिली. बाळासाहेबांच स्वप्न नरेंद्र मोदींनी पुर्ण केले”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा – बाळासाहेबांच्या विचारांविरोधात जाऊन वारसांनी काम केले, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -