Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ६२,९१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८२८ जणांचा...

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत ६२,९१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ८२८ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली असून कोरोना मृतांची संख्या वाढलेली दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार ९१९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८२८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या ४६ लाख २ हजार ४७२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६८ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ६९ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ३८ लाख ६८ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.०६% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण ८२८ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३९ मृत्यू, पुणे-११४, औरंगाबाद-१४, नागपूर-१४, बुलढाणा-१०, चंद्रपूर-१०, ठाणे-१०, यवतमाळ-९, नंदूरबार-७, नाशिक-७, सोलापूर-६, हिंगोली-५, जळगाव-५, जालना-५, सातारा-५, रायगड-४, भंडारा-३, सांगली-३, बीड-२, गडचिरोली-२, कोल्हापूर-१, नांदेड-१, उस्मानाबाद-१ आणि वाशिम-१ असे आहेत

- Advertisement -

राज्यात सध्या ६ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७१ लाख ६ हजार २८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६ लाख २ हजार ४७२ (१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४१ लाख ९३ हजार ६८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा –  Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना परिस्थिती सुधारतेय! २४ तासांत ३,९२५ रुग्णांची नोंद


- Advertisement -

 

- Advertisement -