घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यातील नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; १७९ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: राज्यातील नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; १७९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात काल, शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण आज, शनिवारी नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत देखील चढउतार पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ८१२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १७९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख २६ हजार ८४७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २० हजार ८८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २१ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज राज्यात ८ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५७ लाख ८१ हजार ५५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण १७९ मृत्यूंपैकी १०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३३२ ने वाढली आहे. हे ३३२ मृत्यू, उस्मानाबाद-५८, नाशिक-४५, पुणे-४२, अहमदनगर-४०, ठाणे-२३, औरंगाबाद-२२, रायगड-१७, पालघर-१४, रत्नागिरी-१२, नागपूर-६, जळगाव-५, परभणी-५, सातारा-५, अकोला-४, कोल्हापूर-४, लातूर-४, सांगली-४, जालना-३, सिंधुदुर्ग-३, सोलापूर-३, वर्धा-३, भंडारा-२, बुलढाणा-२, वाशिम-२, यवतमाळ-२, अमरावती-१ आणि गडचिरोली-१ असे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८ लाख ३१ हजार ३३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख २६ हजार ८४७ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २८ हजार २९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार २७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -