घरदेश-विदेशLive Update: भारतातील कोरोना लसीकरणाचा टप्पा ३२ कोटी पार

Live Update: भारतातील कोरोना लसीकरणाचा टप्पा ३२ कोटी पार

Subscribe

भारतात ३२ कोटींहून अधिक जणांचे कोरोना लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

शनिवारी मुंबईत ६४८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजार ६१० इतकी झाली आहे. तसेच मृतांच्या संख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले. सविस्तर वाचा 

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ८१२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १७९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख २६ हजार ८४७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २० हजार ८८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २१ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा


गोव्यातील सरकारने नाईट कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जुलैपर्यंत गोव्यात नाईट कर्फ्यू असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.


ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन


बोगस लस घेतल्याने खासदार मिमी चक्रवर्ती यांची तब्येत खालावली


राज्यपालांना कृषी कायद्याविरोधातील निवेदन देण्यासाठी शेतकरी आंदोलक रस्त्यावर


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठक, या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित आहे.


सारथी संस्थेचे सर्व प्रश्न मविआ सरकारने मार्गी लावल्याबद्दल आभार – संभाजीराजे


नागपूरात देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल


मविआ सरकारने ओबीसी आणि मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षणाचं खातं भाजपाच्या काळात तयार झाले,यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील, या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल- देवेंद्र फडणवीस


अनिल देशमुख आज ईडी चौकशीला जाणार नाही, अनिल देशमुखांच्या वकीलांनी ईडीकडे पत्र देत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. आम्हाला कोणत्या केसबाबत बोलावलं आहे हे आम्हाला सांगीतल नाही, आम्ही पेपर मागितले आहेत असे देशमुख यांचे वकील जयवंत पाटील यांनी म्हटले आहे.


अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स, चौकशीसाठी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात उपस्थितीत राहण्यासाठी हा समन्स बजावण्यात आला आहे.


ओबीसी आरक्षणाच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे पोलिसांकडून प्रवीण दरेकरांसह अनेक भाजप नेते ताब्यात

भाजपाच्या ओबीसी आरक्षणाच्या राज्यव्यापी आंदोलनाला ठाण्यात सुरु झाली आहे. यावेळी अनेक भाजपा नेत्यांनी चक्का जाम आंदोलन केले. कोरोनाचे संकट असतानाही या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी प्रवीण दरेकरांसह आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर ताब्यात


महानरपालिकेनिमित्ताने भाजपाचे वाझे तयार झालेत त्यांचा शोध फडणवीसांनी घ्यावा- हसन मुश्रीफ


परमबीर सिंगासारख्या खाकी वेशातील दरोडे खोरांना गजाआड करण्याची गरज आहे- हसन मुश्रीफ


निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं, करबुडे बोगद्यात अडकली एक्सप्रेस, बोगद्यात रेल्वेचे इंजिन पटरीवरून घसरले, ट्रेनमध्ये २६५ प्रवासी असल्याची माहिती, अपघातात कोणीही जखमी नाही.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. PMLA कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी केली. आज सकाळी ११ वाजता दोघांनाही PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -