घरमहाराष्ट्रअतिउत्साही कार्यकर्त्याचा प्रताप; मतं न बघता आपलाच उमेदवार जिंकल्याची केली घोषणा अन्

अतिउत्साही कार्यकर्त्याचा प्रताप; मतं न बघता आपलाच उमेदवार जिंकल्याची केली घोषणा अन्

Subscribe

राज्यातील ग्रामपंचायतींचा नुकताच निकाल लागला. अनेक धक्कादायक निकाल लागले. दरम्यान, आता ग्रामपंचायत निवडणुकीतील एक अजब प्रकार समोर येत आहे. चंद्रपुरात विजयी उमेदवार पराभूत आणि पराभूत उमेदवार विजयी झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम-तळोधी ग्रामपंचायत निवडणुकीतील हा अजब प्रकार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीची निवडणुकीचा निकाल लागला. भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर कमलेश गेडाम हे विजयी झाल्याचं त्यांच्या प्रतिनिधीने सांगत विजयाचा गुलाल उधळला. गेडाम यांनी आपल्या पॅनलच्या इतर विजयी सदस्यांसह विजयोत्सव देखील साजरा केला होता. मात्र जेव्हा ते निर्वाचन अधिकाऱ्याकडे विजयी झाल्याचं प्रमाणपत्र आणायला गेले असता ते पराभूत झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. या प्रकारामुळे कमलेश गेडाम चांगलेच गोंधळून गेले.

- Advertisement -

बॅलेट मशीन वरील मतं नीट न पाहता गेडाम यांचा प्रतिनिधी उत्साहाच्या भरात मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडला आणि गेडाम विजयी झाल्याची घोषणा केली. त्यानंतर गेडाम यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कमलेश यांच्या विरोधात उभ्या असलेल्या मनोज सिडाम या उमेदवाराने देखील मतमोजणी केंद्रावर जाऊन आपल्याला किती मतं पडली याची खात्री केली नाही आणि स्वतःला पराभूत समजून घरचा रस्ता गाठला. गेडाम यांच्या प्रतिनिधीचा अतिउत्साहीपणा आता चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेने रडणारे हसत आणि हसणारे मात्र रडत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -