घरमहाराष्ट्रराज्यात महाविकास आघाडीची चलती - अजित पवार

राज्यात महाविकास आघाडीची चलती – अजित पवार

Subscribe

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना घवघवीत यश मिळाल्याचं पाहायलं मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारची चलती असल्याचं म्हणाले. शिवाय त्यांनी स्थानिक पातळीवरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.

“ज्या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य आहे त्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसने विजय मिळविला आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, तिथे राष्ट्रवादी आणि जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे तिथे शिवसेना विजयी झाली आहे. एकंदरीत विधान परिषदेचे निकाल लागल्यानंतर बऱ्यापैकी सगळीकडचे चित्र बदललं आहे. ग्रामपंचायती या पहिल्या निवडणुका आहेत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर निवडणुकांच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या काम करुन निवडणुका जिंकल्या. त्यामुळे मी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो. तसंच गावांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही नक्की सोडवू असा शब्द आम्ही देतो,” असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

चौकशीनंतरच धनंजय मुंडेंवर निर्णय घेऊ

शरद पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. ज्या महिलेने आरोप केले आहेत, त्या महिलेवर भाजपचे माजी आमदार, मनसे नेते आणि एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्याने आरोप केल्याने याची सगळी चौकशी पोलिसांनी करुन याची सत्यता पडताळावी. यानंतर आम्ही निर्णय घेऊ. हे स्वत: शरद पवार यांनी सांगितलं आहे.

नामांतराच्या मुद्द्यावर चर्चा करुन मार्ग काढू

आम्ही महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र काम करत असताना एखाद्या मुद्द्यांवर मतमतांतर होत असतं. त्यावेळेस एकत्र बसून त्यावर मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले. प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. आम्ही कॉमन मिनीमम प्रोग्राम ठरवून त्याखाली आम्ही एकत्र आलो आहोत. गेले वर्षभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.

- Advertisement -

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य दिसत नाही

शेतकरी आंदोलनावर बोलताना केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य दिसत नसल्याचं अजित पवार म्हणाले. सर्व चर्चा निष्फळ ठरत आहेत. मात्र, यावर योग्य ती पावले उचलली जात नाही आहेत, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य दिसत नाही आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे. त्याला केंद्र सरकार अशी वागणूक देत आहे, हे दुर्दैव आहे.


हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: परळीत धनंजय मुंडेंचा विजयी षटकार; भाजपला दणका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -