घरमहाराष्ट्रपर्यटकांनो थांबा! कर्जत, खालापूरमधील धबधबे, धरण, तलाव परिसरात जाण्यास बंदी

पर्यटकांनो थांबा! कर्जत, खालापूरमधील धबधबे, धरण, तलाव परिसरात जाण्यास बंदी

Subscribe

ठाण्यासह , कर्जत, रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यात राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने अनेक पर्यटक सध्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. दरवर्षी ठाणे, रायगड, कर्जत परिसरातील धबधबे, धरण, तलाव परिसरात पावसात आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. मात्र रायगड, ठाणे, कर्जत, खालापूर भागांत हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खालाापूर-कर्जतला पिकनिकला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पर्यटकांनो जरा थांबा! कारण खालापूर-कर्जत परिसरातील तलाव, धरण आणि धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कर्जत खालापूर तालुक्यातील एकूण २३ ठिकाणी पर्यटकांना जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. अशी माहिती कर्जत तालुक्याचा उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली आहे.

दरम्यान हवामान विभागाकडून १० ते ११ दरम्यान रायगड, ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर तालुक्यातील १२ व कर्जत तालुक्यातील ११ धरण, धबधबे आणि तलाव परिसरात पर्यटकांना येण्यास पूर्णपणे बंदी असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

खालापूरमधील ‘ही’ १२ पर्यटन स्थळे राहणार बंद

खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा परिसर, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाण वरोसे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, धामण कातरवाडी धरण, कलोते धरण आदी ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी असणार आहे.

तर कर्जतमध्ये ‘ही’ ११ पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

कर्जत तालुक्यातील आषाणे कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण/पाझर तलाव, पळसदरी धरण, कोढांणे धरण धबधबा, पाली भुतवली धरण, नेरळ जुम्मापट्टी धरण, बेडीसगाव धरण, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा आदी ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.

- Advertisement -

covishield vs covaxin :कोवॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड अधिक प्रभावी; या संशोधनावर भारत बायोटेकने व्यक्त केला संताप


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -