घरताज्या घडामोडीआठवड्याभरात 'समृद्धी'वर दुसरी दुर्घटना; निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला

आठवड्याभरात ‘समृद्धी’वर दुसरी दुर्घटना; निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला

Subscribe

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजाजवळ एका मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. जवळपास 500 मीटर लांबीचा असून दोन डोंगराळ भागांना जोडणारा हा पूल आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 कामगार ठार तर 2 कामगार जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. या महामार्गावर निर्माणाधीन पूल कोसळला आहे.

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजाजवळ एका मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. जवळपास 500 मीटर लांबीचा असून दोन डोंगराळ भागांना जोडणारा हा पूल आहे. या पुलाचा एक गर्डर खाली उभा असलेल्या ट्रकवर कोसळला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आता महामार्गाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्गाच्या मुंबई-नागपूर या मार्गावर ही घटना घडली आहे. दरम्यान येत्या 2 मे रोजी या महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र, या आठवड्याच्या सोमवारी नागपूरकडून 16 व्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाला. त्यामुळे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले. दरम्यान, लोकार्पणाच्या घाईमध्ये निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप आता केले जात आहेत.

16 व्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात

- Advertisement -

समृद्धी महामार्गाला एकूण 105 कमानी आहेत. त्यापैकी मोठी असलेली 16 व्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळला पुढे ढकलावं लागलं आहे. या अपघातातील मृत मजूर बिहारचा असल्याची माहिती समजत आहे.


हेही वाचा – गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -