घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राने 'या'मध्ये पटकविला प्रथम क्रमांक; मुख्यमंत्री शिंदे यांनी केले कौतुक

महाराष्ट्राने ‘या’मध्ये पटकविला प्रथम क्रमांक; मुख्यमंत्री शिंदे यांनी केले कौतुक

Subscribe

मुंबई | जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकविला आहे. जलशक्ती मंत्रालयाने (Ministry of Jal Shakti,) पहिल्यांदाच भारतीय जलसंस्थांची गणना करून एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरित्या राबविण्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रसर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक जलसंधारणाच्या योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत. महाराष्ट्राला पाण्याची समस्या यापुढे जाणवणार नाही. याबद्दल महायुती सरकार कटिबद्ध असून त्यास अनुसरून विविध योजना देखील यशस्वीपणे सरकार राबवित आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – आमच्यावर कारवाई.. मग दादा भुसे, राहुल कूल यांच्यावर का नाही?, संजय राऊतांचा प्रश्न

- Advertisement -

जलशक्ती मंत्रालयाने पहिल्यांदा देशव्यापी जलसंधारण गणनेनुसार महाराष्ट्रात एकूण ९७,०६२ जलस्त्रोतांची आढळून आले आहेत. यात ९६, ३४३ ग्रामीण भागात आणि ७११ शहरी भागात आहेत. राज्यातील सर्व जलस्त्रोतांपैकी ७७ टक्के भूजल पुनर्भरणासाठी वारले जातात. यात औरंगाबाद, जालना आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा समावेश सर्वाधिक पुनर्भरण संरचनांसह भारतातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. तसेच आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि उत्तर प्रदेशातील सीतापूर हे त्याखालचे दोन जिल्ले आहेत.

हेही वाचा – आता ते कुठे गायब झाले? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल टोला

मुख्यमंत्र्यांनी सचिवालयातील ६५ फाईल्सचा केला निपटारा

सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला. एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सुटीवर गेल्याची मंगळवारी राज्यभरात चर्चा होती. परंतु, त्यातच मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात राहून मंत्रालयातील फायलींचा निपाटारा केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -