घरमहाराष्ट्रSindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसला दुर्मिळ ब्लॅक पँथर, परिसरात दहशतीचे वातावरण

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसला दुर्मिळ ब्लॅक पँथर, परिसरात दहशतीचे वातावरण

Subscribe

सिंधूदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचे अस्तित्व आढळून आले आहे. जिल्ह्यातील कुडाळमधील गोवारी गावात पाण्याच्या टाकीत हा ब्लॅक पँथर आढळला आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत या ब्लॅक पँथरची सुटका केली आहे. हा ब्लॅक पँथर साधारण एक ते सव्वा वर्षांचा आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.

गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील तुकाराम राऊळ यांच्या आंबा-काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या ८ फूट खोल पाण्याच्या टाकीमध्ये काळा बिबटया (ब्लॅक पँथर) पडल्याची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. यानंतर वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकाने ८ फूट खोल टाकीमध्ये पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात घेत सुखरुप बाहेर काढण्यात आले. भक्ष्याच्या मागे धावत असताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

सदर बिबट हा नर जातीचा असून अंदाजे दोन वर्षे वयाचा आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. काळा बिबटया हा अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून जनुकीय बदलांमुळे त्याचा रंग काळा होत असतो. जिल्ह्यात ब्लॅक पँथरचे हे पहिलाचं रेस्क्यू ऑपरेशन होते. बिबट हा निशाचर असून बहुतांशी भक्ष्याच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो. बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारे प्राणी जसे बेडूक, उंदीर, घुशी, ससे, साळींदर, घोरपड, पक्षी, माकडे यांच्यापासून ते लहान आकाराची हरणे यांच्यावरती ते उपजीविका करतात. बिबट हा अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक आहे. काळा बिबट हा अत्यंत दुर्मिळ बिबट असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे जिल्ह्यातील जंगलाचे परिपुर्णतेचे सकारात्मक प्रतिक आहे. कोणताही वन्यप्राणी जखमी अथवा अडकलेल्या स्थितीत आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.


 

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसला दुर्मिळ ब्लॅक पँथर, परिसरात दहशतीचे वातावरण
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -