घरमहाराष्ट्रमहिला आयोगाने गुलाबरावांवर कारवाईची तत्परता का दाखवली नाही; सुषमा अंधारे नाराज

महिला आयोगाने गुलाबरावांवर कारवाईची तत्परता का दाखवली नाही; सुषमा अंधारे नाराज

Subscribe

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या वक्तव्यावरून राज्यभरात निदर्शने झाली. दरम्यान या प्रकरणी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दोन वेळा फोन केला मात्र चाकणकरांनी एकही कॉल उचलला नाही असा आरोप सुषमा अंधारे यांनी आज केला आहे. तसेच महिला आयोगाच्या भूमिकेवरही अंधारेंनी नाराजी व्यक्त केली आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होत्या.

यावेळी अंधारे म्हणाल्या की, सत्तेचा हा एवढा माज म्हणावा की, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांनी थेट माफी मागणं टाळलं. याबाबत महिला आयोगाला सांगावसं वाटत की, अब्दुल सत्तारांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जी तत्परता दाखवली ती तत्परता तुम्ही गुलाबराव पाटलांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किंवा नोटीस बजावण्यासाठी  का दाखवली नाही. असा सवालही महिला आयोगाला विचारला आहे.

- Advertisement -

गुलाबराव पाटील हे सरंजामी वृत्तीचे आहेत. त्यांचे वाक्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाला आक्षेपार्ह वाटत नाही. पोलीस देखील गुलाबराव पाटलांचे हस्तक आहेत, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.

सुप्रिया सुळेंचा मुद्दा मी मांडते तो मित्रपक्ष म्हणून नाही तर एक महिला आणि बाईपणाच्या संवेदना म्हणून मांडतेय. दरम्यान गुलाबराव पाटलांविरोधात कारवाईसाठी रुपाली चाकणकरांना दोन तीन वेळा कॉल केला मात्र त्यांनी तो उचलला नाही. असा दावा अंधारे यांनी केला आहे.


काँग्रेस पदाधिकाऱ्याचा भारत जोडो यात्रेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -