घरताज्या घडामोडीराज्यसभेच्या मतदानासाठी आमदारांना कानमंत्र, सत्ताधारी महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

राज्यसभेच्या मतदानासाठी आमदारांना कानमंत्र, सत्ताधारी महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

Subscribe

ट्रायडंट हॉटेलमध्ये आमदार पोहोचल्यानंतर त्यांची नोंदणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. यावेळी त्यांची स्वाक्षरीही घेतली जात होती. एकूण किती आमदार उपस्थित होते तसेच ते कोणत्या पक्षाचे होते, त्यात किती अपक्ष आमदार आहेत याची चाचपणी करण्यासाठीच ही नोंदणी करण्यात आल्याचे समजते.

सत्ताधारी महाविकास आघाडीने राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून काही छोट्या पक्षांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतल्याचे लक्षात येताच आघाडीने मंगळवारी सर्व आमदारांची तातडीची बैठक घेतली. राज्यसभेची तांत्रिक माहिती देण्यासाठी आमदारांची बैठक बोलावल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आमदारांचे संख्याबळ तपासण्यासाठीच ही बैठक असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या निमित्ताने महाविकास आघाडीने एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले. बैठकीत आमदारांना राज्यसभा निवडणुकीतील मतदानाबाबत कानमंत्र देण्यात आला.

भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आमदारांकडे मोर्चा वळवला आहे. अशातच काही छोट्या पक्षांनी फटकून वागायला सुरूवात केल्याने महाविकास आघाडीसाठी अडचण होऊ शकते, त्यामुळे साहजिकच आघाडीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आमदारांना एकत्र करून नेमके संख्याबळ तपासण्याचे ठरवले. त्यासाठीच ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली.

- Advertisement -

आघाडीचे आणि आघाडीला समर्थन देणारे अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक मल्लिकार्जुन खरगेखर्गे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले. छोट्या पक्षांच्या आमदारांनी काहीसा नाराजीचा सूर आळवायला सुरूवात केल्याने महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या १२ आमदारांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवली.

गीता जैन, मंजुळा गावीत, आशिष जयस्वाल, देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), किशोर जोरगेवार, संजय शिंदे, नरेंद्र भोंडेकर शामसुंदर शिंगे (शेकाप), विनोद अग्रवाल, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल,विनोद निकोले (माकप) हे बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडीला अपक्ष आमदारांचे मन वळवण्यात यश आल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

- Advertisement -

दरम्यान, ट्रायडंट हॉटेलमध्ये आमदार पोहोचल्यानंतर त्यांची नोंदणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. यावेळी त्यांची स्वाक्षरीही घेतली जात होती. एकूण किती आमदार उपस्थित होते तसेच ते कोणत्या पक्षाचे होते, त्यात किती अपक्ष आमदार आहेत याची चाचपणी करण्यासाठीच ही नोंदणी करण्यात आल्याचे समजते.

दोन विजयोत्सवाची तयारी सुरू करा : उद्धव ठाकरे

दोन विजयोत्सवाची तयारी सुरू करा, एक राज्यसभेच्या निवडणुकीची तर दुसरी त्यानंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची. या दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येणार आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी या दोन विजयोत्सवाची तयारी सुरू करा असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. भाजपच्या नेत्यांनी कितीही आणि कसाही प्रयत्न केला तरी आता आघाडीच्या विजयाच्या मार्गात त्यांचा कोणताही अडसर येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची जवाबदारी योग्यपणे पार पाडा. विजय आपलाच आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितल्याचे कळते.


हेही वाचा : महाविकास आघाडीच्या बैठकीला 12 अपक्ष आमदार उपस्थित, मुख्यमंत्री म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -