घरक्राइमसचिन वाझेनंतर आता सुनील मानेची कार NIA ने केली जप्त

सचिन वाझेनंतर आता सुनील मानेची कार NIA ने केली जप्त

Subscribe

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA च्या अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सुनील माने याची कार NIA ने जप्त केली आहे. सुनिल माने याच्या घरी NIA नं काल रविवारी छापेमारी केली. यावेळी काही कागदपत्र आणि कार जप्त करण्यात आली. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

NIA ने रविवारी अंधेरी, कांदिवली आणि बोरिवली भागात छापेमारी केली. सुनिल माने याच्या घरी छापा टाकत NIA ने मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. तसंच या वेळी NIA ने मानेच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे माने देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेची मदत करण्याचा सहभाग आढळल्याने अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असता एनआयएच्या विशेष न्यायालयाने सुनील माने यांना २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहितीएनआयएने न्यायालयात दिली होती. दरम्यान, NIA च्या विशेष न्यायालयाने NIA कोठडी सूनवल्यानंतर अखेर सुनील माने यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -