घरताज्या घडामोडी'OBC मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यास सिव्हिल वॉर होईल', संभाजी ब्रिगेडच्या नेत्याचे...

‘OBC मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यास सिव्हिल वॉर होईल’, संभाजी ब्रिगेडच्या नेत्याचे वक्तव्य

Subscribe

मराठा समाजाला SEBC या प्रवर्गातून महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे. यामुळे मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे जुने नेते प्रवीण गायकवाड यांनी मात्र आरक्षणाच्या बाबतीत वेगळीच भूमिका मांडली आहे. एसईबीसी (SEBC) प्रवर्गात आरक्षण मिळवणे कठिण आहे, त्यामुळे मराठा समाजाने EWS मध्ये जे आरक्षण मिळत आहे. ते पदरात पाडून घ्यावेत. तसेच ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला अंतर्भूत केल्यास नागरी युद्धासारखी परिस्थिती उद्भवेल, असे वक्तव्य प्रवीण गायकवाड यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

प्रवीण गायकवाड म्हणाले की, एसईबीसी आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे आर्थिक निकषांवर (EWS) मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, कारण हे आरक्षण कोर्टात टिकू शकते, अशी थेट भूमिका गायकवाड यांनी मांडली आहे. मात्र भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी EWS आरक्षणाचा विरोध केला होता. मराठ्यांनी हे आरक्षण घेतल्यास SEBC आरक्षणासाठी जी लढाई कोर्टात सुरु आहे, त्यावर नकारात्मक परिणाम होईल, असे ते म्हणाले होते. यामुळे गायकवाड आणि छत्रपतींच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे मराठा समाजात मात्र गोधंळ वाढला आहे.

- Advertisement -

प्रवीण गायकवाड पुढे म्हणाले की, मराठा समाजाला पुढे करुन काही लोक राजकीय स्वार्थासाठी या विषयाचा वापर करत आहेत. यातून त्यांना स्वतःचे नेतृत्व समाजावर थोपवायचे आहे. मात्र या आंदोलनामुळे समाजातील तरुणाईचं मोठं नुकसान होत असल्याची टीका त्यांनी केली. आपण किती दिवस आरक्षणाचा मुद्दा रेटायचा याचाही विचार केला पाहीजे. अजून किती पिढ्या वाट पाहायची? असाही प्रश्न उपस्थित करत गायकवाड म्हणाले की आता आरक्षणाचा विषय संपवला पाहीजे.

तसेच खासगीकरणामुळे आता सरकारी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे ताट जरी मिळवले तरी त्यात जेवण नसेल तर काय उपयोग? त्यामुळे चांदीच्या ताटात जेवण आहे ते जेवावे, असा सल्लाही गायकवाड यांनी मराठा समाजाला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -