घरमहाराष्ट्रमराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवार बुधवारी होणार जाहीर

मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवार बुधवारी होणार जाहीर

Subscribe

मराठा क्रांती मोर्च्याने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, येत्या बुधवारी मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. या उमेदवारांकडून निवडणुकीपूर्वी एक बॉण्ड लिहून द्यावा लागणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरला आहे. मराठा क्रांती मोर्च्याने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, येत्या बुधवारी मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अपक्ष उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहीती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.

या मतदारसघातून लढणार निवडणूक 

ठाणे लोकसभा मतदारसंघ(मीरा भाईंदर – ठाणे – नवी मुंबई), ईशान्य मुंबई लोकसभा (मुलुंड – भांडुप – कांजुरमार्ग – विक्रोळी – घाटकोपर – मानखुर्द), उत्तर पश्चिम मुंबई (गोरेगाव – कांदिवली – जोगेश्वरी) या मतदारसंघातुन मराठा क्रांती मोर्चाचे अपक्ष उमेदवार निश्चित झाले आहेत. बुधवारी नावे जाहीर करून हे उमेदवार रायगडला जाऊन छत्रपती शिवराय आणि जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणूक लढवणारा प्रत्येक उमेदवार पुढील ५ वर्ष कुठल्याही पक्षात जाणार नाही अशा प्रकारचा बॉण्ड देखील यावेळी लिहून घेऊन समाजाचा वापर होणार नाही याची शाश्वती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समाजाला देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -