घरमहाराष्ट्रमराठा आंदोलनादरम्यान चाकणमध्ये जाळपोळ

मराठा आंदोलनादरम्यान चाकणमध्ये जाळपोळ

Subscribe

गेल्या आठवडाभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाला चाकण, खेड-राजगुरुनगरमध्ये हिंसकवळण आले आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांनी ८० गाड्यांची तोडफोत तर १५ गाड्या पेटवून दिल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन गेल्या आठवडाभरापासून राज्यभरामध्ये आंदोलन सुरु आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला आज हिंसक वळण आले आहे. खेड-राजगुरुनगर, पिंपरी-चिंचवड, चाकण, आळंदी या भागामध्ये आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलक संतप्त झाले आहेत. आंदोलकांनी रास्तारोको, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे.

आंदोलकांनी ८० गाड्यांची केली तोडफोड

चाकण, खेड-राजगुरुनगर, पिंपरी – चिंचवड येथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. पुणे – नाशिक महामार्गावर आंदोलकांनी रास्तारोको केला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर संतप्त झालेल्या आंदोलकांनी जवळपास ८० गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये शिवशाहीच्या ४ बसचा समावेश आहे. आहे. तर खासगी आणि एसटी अशा एकूण १२ ते १५ गाड्या पेटवून दिल्या.

- Advertisement -

दगडफेकीत एक पोलीस जखमी

दरम्यान, चाकण येथे या आंदोलनाला सर्वात जास्त हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक कली. या दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. संतप्त झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रूधुराच्या निळकांड्या फोडल्या. तर आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाड्या जाळल्या तर अग्निशमन दलाची एक गाडी पेटवून दिली.

भिमाशंकरला जाणारे भाविक जखमी

सकाळी ११ वाजल्यापासून पुणे- नाशिक महामार्ग आंदोलकांनी अडवून धरल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान भिमाशंकरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसला देखील आंदोलकांनी लक्ष्य केले. आंदोलकांनी भाविकांच्या बसची तोडफोड केली या हल्ल्यामध्ये ५ भाविक जखमी झाले.

- Advertisement -

चाकण, आळंदी आणि खेडमध्ये कडकडीत बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सकल मराठा समाजाच्यावतीने खेड-राजगुरुनगर, चाकण, आळंदीमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे या भागामध्ये आज सर्व व्यवसायिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला.

एक प्रतिक्रिया

  1. एकही शिवशाही बस ला हात लावला नाही कोणी उगाच अफवा सोडू नका हिच कळकळी ची विनंती??

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -