घरमहाराष्ट्रबीडमधील 'त्या' प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल, पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश

बीडमधील ‘त्या’ प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल, पोलिसांना तातडीने कारवाईचे निर्देश

Subscribe

जमिनीच्या वादातून एका महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज गावात ही घटना घडली. या प्रकरणाची महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे.

बीड : जमिनीच्या वादातून एका महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळुंज गावात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह अन्य तिघांवर विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतु या प्रकरणाची महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे. (Women’s Commission took notice of ‘that’ case in Beed, directed the police to take immediate action)

हेही वाचा – Maratha Reservation : ‘मलमपट्टी नको, कायमचा उपचार पाहिजे; 24 तारखेनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही’

- Advertisement -

बीडमधील या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. अतिशय संतापजनक अशा या घटनेत रघु पवार, राहुल जगदाळे, प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकणकर यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवरून दिली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी तातडीने पुढील कारवाई करून महिलेला न्याय द्यावा, असेही रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत लिहिले आहे की, “बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग करत निर्वस्त्र करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घटना कळताच मी स्वतः पोलीस अधिक्षक बीड यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेतली.अतिशय संतापजनक अशा या घटनेत रघु पवार, राहुल जगदाळे, प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील कारवाई तातडीने करावी असे निर्देश दिले आहेत. महिलेला न्याय मिळेपर्यंत आयोग याचा पाठपुरावा करेल.
@BEEDPOLICE @DGPMaharashtra @Devendra_Office” असे लिहित चाकणकर यांनी ही पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

बीडमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेतील पीडित महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या त्यांच्या वडिलांपासून म्हणजेच गेल्या अनेक वर्षांपासून वाळुंज शिवारातील जमीन कसत आहेत. पण राहुल आणि रघु हे एक दिवस माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला खड्ड्यात पाडले. या दोघांनी माझ्यावर त्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस याठिकाणी उपस्थित होत्या. हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या प्राजक्ता यांनी या दोघांना मला मारण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच, आमच्या शेतात येते ही पारधी, असे प्राजक्ता धस म्हणाल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -