घरताज्या घडामोडीजळगावमध्ये तापमानात सर्वाधिक घट, तर विदर्भात पावसाची हजेरी

जळगावमध्ये तापमानात सर्वाधिक घट, तर विदर्भात पावसाची हजेरी

Subscribe

जानेवारी महिना हा कडक थंडीचा महिना असून, राज्याच्या अनेक भागांत तापमान घट होताना दिसत आहे. तापमानात घट झाल्याने थंडी वाढत आहे. मात्र, असं असलं तरी राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

जानेवारी महिना हा कडक थंडीचा महिना असून, राज्याच्या अनेक भागांत तापमान घट होताना दिसत आहे. तापमानात घट झाल्याने थंडी वाढत आहे. मात्र, असं असलं तरी राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतातील पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Maximum drop in temperature in Jalgaon while presence of rain in Vidarbha)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जळगावमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार, जळगावमध्ये १२ तापमान असून, नाशिक आणि औरंगाबादमध्ये 13.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र एकिकडे तापमानात घट होतेय, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होतं. आता ह्या अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, कांदा अशी पिकं धोक्यात आली आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, नांदुरा, शेगाव इथं पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तर भंडारा, गोंदियात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे.

- Advertisement -

या पावसाचा तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.


हेही वाचा – ‘स्वराज्यरक्षक’ असा इतिहासात कुठेही उल्लेख नाही; ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची फेसबुक पोस्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -