घरमहाराष्ट्रमाझी मुंबई! पालिकेतर्फे खुली बालचित्रकला स्पर्धा, कुठे आणि कसा कराल अर्ज?

माझी मुंबई! पालिकेतर्फे खुली बालचित्रकला स्पर्धा, कुठे आणि कसा कराल अर्ज?

Subscribe

मुंबई – मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे महापौर आयोजित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे ८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध ठिकाणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे गेली २ वर्षे कोरोना साथरोगाच्या प्रादर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदा प्रत्यक्ष स्वरुपात विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे काढणाऱ्या स्पर्धकांसाठी ५०० रुपये ते २५ हजार रुपयांपर्यंतची तब्बल ५५२ पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देखील देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे उप आयुक्त केशव उबाळे यांनी दिली आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ‘माझी मुंबई’ या विषयावर भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून यावर्षी देखील ही स्पर्धा ४ गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता “मी आणि माझा फॅन्सी ड्रेस, मी आणि माझी आई, मी व फुलपाखरू” असे ३ विषय ठेवले आहेत. तर इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २ करिता, “माझ्या बाहुलीचे लग्न, मी मेकअप करतो/करते, मी व माझा आवडता प्राणी” असे ३ विषय आहेत. त्याचप्रमाणे, इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ३ करिता “आम्ही व्यायाम करतो / करते, आम्ही वर्ग / शाळा सजावट करतो, आम्ही बागेत खेळतो” असे ३ विषय आहेत.

- Advertisement -

तर इयत्ता नववी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४ करिता “माझ्या स्वप्नातील मुंबई, देशाच्या प्रगतीत महिलांचे मोलाचे योगदान व सांघिक खेळातील जिंकण्याची जिद्द” असे ३ विषय आहेत.

तसेच, या चारही गटातील स्पर्धकांसाठी एकूण ५५२ रोख पारितोषिके असणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक गटात २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, २० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, १५ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक आणि ५ हजारांची रुपयांची १० पारितोषिके असणार आहेत. तर या व्यतिरिक्त पालिकेच्या प्रत्येक विभाग स्तरावर उत्तम चित्रांसाठी ५०० रुपयांचे इतक्या रकमेची पाचशे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या स्पर्धेत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भाषिक महापालिका शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विना-अनुदानित प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी त्यांच्या शाळांनी ७७७७-०२५-५७५ या क्रमांकावर किंवा www.balchitrakala.com या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि त्यांच्या शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केले आहे.

महापालिका क्षेत्रातील ४५ ठिकाणांची माहिती 

‘ए’ विभाग – कुपरेज बॅण्डस्टॅण्ड मैदान, `ओव्हल मैदानाजवळ;
..
‘बी’ विभाग – सिताराम शेणॉय उद्यान, नवरोजी हिल रोड क्र. ७, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनजवळ;
..
‘सी’ विभाग – स. का. पाटील उद्यान, चर्नीरोड स्टेशन जवळ, महर्षि कर्वे मार्ग;
..
‘डी’ विभाग – ऑगस्ट क्रांती मैदान, ऑगस्ट क्रांती मार्ग;
..
‘ई’ विभाग – वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा (पूर्व);
..
‘एफ दक्षिण’ विभाग – कामगार मैदान, के. ई. एम. रुग्णालयाजवळ, परळ;
..
‘एफ उत्तर’ विभाग – न्यू सायन महानगरपालिका शाळा मैदान, शीव;

श्री. के. डी. गायकवाड महानगरपालिका शाळेचे मैदान;

कोरबा मिठागर महानगरपालिका शाळेचे मैदान;
..
‘जी दक्षिण’ विभाग – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मनोरजंन मैदान;

सुनिता दत्‍ताजी नलावडे मनोरंजन उद्यान, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल;

आदर्श मैदान, कोळीवाडा, वरळी;
..
‘जी उत्तर’ विभाग – संत ज्ञानेश्‍वर उद्यान, चैत्‍यभूमीजवळ, दादर (पश्चिम);
..
‘एच पूर्व’ विभाग – एम. आय. जी. क्रिकेट क्लब, वांद्रे (पूर्व);
..
‘एच पश्चिम’ विभाग – कमला रहेजा उद्यान (राजेश खन्ना उद्यान), रोटरी, गजधर पार्कजवळ;
..
‘के पूर्व’ विभाग – छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, पंपहाऊस, अंधेरी (पूर्व);

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्‍पग्राम, पूनम नगर, जोगेश्‍वरी (पूर्व);
..
‘के पश्चिम’ विभाग – कमलाकर पंत वालावलकर उद्यान, ओशिवरा;
..
‘पी दक्षिण’ विभाग – प्रबोधनकार ठाकरे मैदान, गोरेगाव (पश्चिम);

आरे कॉलनी महानगरपालिका शाळा मैदान, गोरेगाव (पूर्व);
..
‘पी उत्तर’ विभाग – शीला रहेजा उद्यान, खडकपाडा, अरुण कुमार वैद्य मार्ग, दिंडोशी, मालाड (पूर्व);

स्वामी विवेकानंद क्रीडांगण, नवजीवन शाळेजवळ, राणीसती मार्ग, मालाड (पूर्व);

प्रि‍यदर्शिनी इंदिरा गांधी उद्यान, पारेखनगर, मालाड (पूर्व);

चाचा नेहरु क्रीडांगण, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम);

आण्णा सावंत मनोरंजन उद्यान, मार्वे रोड, मालाड (पश्चिम);
..
‘आर दक्षिण’ विभाग – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, समता नगर;

बजाज रोड महानगरपालिका शाळा मैदान, कांदिवली (पश्चिम)

चारकोप महानगरपालिका शाळा मैदान, सेक्टर – १, चारकोप;
..
‘आर मध्य’ विभाग – वीर सावरकर उद्यान, बोरिवली (पश्चिम);
..
‘आर उत्तर’ विभाग – आजी – आजोबा उद्यान दहि‍सर (पूर्व);

लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान (भावदेवी मैदान), दहिसर (पश्‍चिम);
..
‘एल’ विभाग – गंगाराम साटम उद्यान, काजूपाडा महानगरपालिका शाळेजवळ, कुर्ला;

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान, शिवसृष्टी, कुर्ला (पूर्व);
..
‘एम पूर्व’ विभाग – छत्रपती शाहूजी महाराज उद्यान, शिवाजी नगर महानगरपालिका शाळेजवळ;

स्व. अमरनाथ पाटील मनोरंजन क्रीडा संकुल, गोवंडी;
..
‘एम पश्चिम’ विभाग – टिळकनगर महानगरपालिका शाळेचे मैदान, टिळकनगर;

आचार्य उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चेंबूर;
..
‘एन’ विभाग – आचार्य अत्रे मैदान, पंत नगर, घाटकोपर (पूर्व);

माणेकलाल मैदान, नरसी मैदान मार्ग, घाटकोपर (पश्चिम);
..
‘एस’ विभाग –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जनता विद्यालयाजवळ, विक्रोळी (पूर्व);

प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यान, वर्षा नगर, विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (पूर्व);
..
‘टी’ विभाग – डॉ. चिंतामणराव देशमुख उद्यान, स्वा. सावरकर रुग्णालयासमोर, मुलुंड (पूर्व);

लाला तुळशीराम उद्यान, बेस्ट बस डेपोच्या समोर, मुलुंड (पश्चिम);

सरदार प्रतापसिंग उद्यान, मुलुंड निमकर सोसायटी, मुलुंड (पश्चिम),

धामणगाव महानगरपालिका शाळा मैदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -