घरमहाराष्ट्रकेसरकरांना गांर्भियाची जाणीव असायला हवी - हर्षवर्धन जाधव

केसरकरांना गांर्भियाची जाणीव असायला हवी – हर्षवर्धन जाधव

Subscribe

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका केल्या आहेत. त्यांना परिस्थितीचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. आरक्षणासाठी मराठा  संघटना अधिक आक्रमक झाल्या असून, जोवर मुख्यमंत्री आरक्षणाचा निर्णय घेत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यातच आता शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. आज त्यांनी शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका करत त्यांना घरचा आहेर दिला. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आज मोतोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही. पण, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांपैकी दिपक केसरकर यांनी काय बरं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे. ‘राज्यात तरूण आत्महत्या करत आहेत आणि राज्याचे गृहराज्यमंत्री असे वक्तव करत असतील तर काय म्हणावे?’ अशी संतप्त प्रतिक्रिया जाधव यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

त्याचबरोबर ‘दिपक केसरकर हे या गंभीर विषयाला सहजपणे घेत आहेत ते राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. जेव्हा आत्महत्येसारखी घटना होत असतात तेव्हा सगळ्यात आधी त्याची नोंद गृह विभागाकडे होत असते. त्यामुळे केसरकरांनी या गोष्टी सहजपणे  घेऊ नयेत’, असा सल्ला देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला.

- Advertisement -

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

‘आज सकाळी औरंगाबाद येथे मराठा समाजाच्या एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. आरक्षणासाठी  आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सरकारने हे गांभिर्याने घेतले पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना म्हटले, ताबोडतोब मराठा आरक्षणाबाबतचा अद्यादेश काढा. पण मुख्यमंत्री म्हणाले,

ताबोडतोब अद्यादेश काढून तो कोर्टात टिकणार नाही. मात्र आपल्याला काही तरी केले पाहिजे की, लोकांना वाटेल हे सरकार काही तरी लोकांसाठी काम करत आहे असे मी मुख्यमंत्रींना सांगितले. पण हे सरकार काहीच करत नाही हे माझ्यालक्षात आल्यावर मी राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज्यपालांच्या एडीसीसींशी बोलतो आणि हे सरकार जर अद्यादेश काढत नसेल तर हे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मी त्यांना सांगितले’, असे जाधव यांनी यांनी सांगितले.

- Advertisement -

जोवर अद्यादेश काढत नाही तोवर ठिय्या आंदोलन करणार

तसेच ‘जोवर हे सरकार अद्यादेश काढत नाही, तोवर मी ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही’, असा इशारा जाधव यांनी सराकारला दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे शिवसेना आमदार आता आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन करते वेळी पोलिसांनी त्यानां ताब्यात घेतले. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -