घरताज्या घडामोडीआमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कसबे दवंडा या गावामध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली.

दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कसबे दवंडा या गावामध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात हल्लेखोरावर रात्री उशिरा (Akhara Balapur Police) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते.

प्रज्ञा सातव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या हल्ल्यानंतर आमच्यावर हल्ला करून घरी बसवण्याचा कट असू शकतो, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

कसबे दवंडा या गावांमध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा या हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्याची माहिती देताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, “संध्याकाळी 8 वाजता कसबे दवंडा या गावात असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी असताना, मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आला, मला त्यानं ओढलं आणि हल्ला केला. समोर असलेल्या लोकांनी या व्यक्तीला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले.

- Advertisement -

काय म्हणाल्या प्रज्ञा सातव?

कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना माझ्यावर एका व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार आहे. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.


हेही वाचा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेंची ख्याती पोहोचली सातासमुद्रापार; न्यूयॉर्कमधील टाईम्स क्वेअरमध्ये लागले बॅनर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -