घरताज्या घडामोडीराज्यपाल महोदय परीक्षेचा हट्ट धरु नका

राज्यपाल महोदय परीक्षेचा हट्ट धरु नका

Subscribe

मनविसेचे जिल्हाध्यक्ष गोहाड यांनी पाठवले पत्र

करोना विषाणू महामारीमुळे भारतात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाउन पाळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे जोखमीचे आहे. राज्य सरकार व राज्यपाल यांच्या वादात विद्यार्थ्यांना वेठीस न धरता पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, या मागणीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी पाठवले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अद्याप या निर्णयाला मान्यता दिलेली नाही. यामुळे यंदा पदवीच्या अंतिम परीक्षा होणार किंवा नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. शिवसेना व मनसे यांच्या विद्यार्थी संघटनांनी या परीक्षा रद्द करण्याची आधीपासून मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर राज्यपालांनीही या परीक्षा रद्द कराव्यात यासाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेकडून राज्यपालांना पत्र पाठवले जात आहे. यामुळेच मनविसेचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी कोव्हिड १९ मुळे जग हैराण झाले असून या काळात अनेक महत्वाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. महाराष्ट्रातही कोव्हिड१९ विषाणूचा मोठ्याप्रमाणावर संसर्ग झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपणास पत्र पाठवून परीक्षा रद्द करण्याची मागणी केलेली आहे. आता राज्य सरकारने परीक्षा रद्द करणार असल्याचे जाहीर केले असून आपला त्या निर्णयास विरोध आहे. त्यामुळे आपल्या मताचा पुनर्विचार करून राज्य व राजभवन यांच्यातील मतभेदामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आपल्या हट्टामुळे परीक्षा घेण्यात आल्या तर त्याला स्वर्वस्वी आपण जबाबदार ठराल. अंतिम वर्षाचे विद्यार्थी आपल्या नातवासारखे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणीही गोहाड यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -