Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र वकील साहेब शपथेवर खोट बोलणे हा गुन्हा, मनसेचा अनिल परबांच्या खुलाशावर निशाणा

वकील साहेब शपथेवर खोट बोलणे हा गुन्हा, मनसेचा अनिल परबांच्या खुलाशावर निशाणा

वाझेंनी अनिल परब यांच्यावर काय आरोप केलेत?

Related Story

- Advertisement -

‘वकील साहेब शपथेवर बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा’ असे ट्विट करत मनसे नेचे संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अंबानी स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेनी एनआयएच्या न्यायालयात पत्र देऊन वकील अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रात अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत वाझेचे आरोप फेटाळत आपल्या मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली होती. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा आहे” Advocate”साहेब शपथेवर खोट बोलणं हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा’ अशा आशयाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

- Advertisement -

वाझेंनी अनिल परब यांच्यावर काय आरोप केलेत?

सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत असे म्हणत अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मी आरोप नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

- Advertisement -