मोदी – पवार भेट, सरकार स्थापनेची माहिती कोणीही ट्विट करून देत नाही – सुधीर मुनगंटीवार

raza akademi opposes vande mataram decision taken by cultural affairs minister sudhir mungantiwar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. या एका तासाच्या भेटीतून कोणतही नवीन सरकार किंवा नवीन आघाडी जन्माला येईल असे दूरपर्यंत वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तर सरकार बनवण्याच्या हालचाली या कोणी ट्विट करून सांगत नाही. सरकार बनवण्याच्या ज्या हालचाली तसेच बैठका होतात, त्याबाबतची माहिती कोणी ट्विटच्या माध्यमातून देत नाही. त्यामुळे ही भेट नक्कीच सरकार बनवण्यासाठी नव्हती असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे सरकार जेव्हा बनायचे तेव्हा बनेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर झालेली भेट ही महाराष्ट्रातील प्रश्नांच्या निमित्ताने झाली असाही असा अंदाज सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे, त्यामध्ये त्रुटी आहेत. सरकार ज्या पद्धतीने सध्या कारभार करते आहे त्यामध्ये उणिवा आणि त्रुटी आहेत. त्यामुळे या उणिवा आणि त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावे यासाठी ही भेट असावी. तसेच सहकार खात्याच्या निमित्तानेही ही चर्चा असू शकते असेही मुनगंटीवार म्हणाले. सहकार खाते हे स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या गोष्टी विसराव्यात आणि सहकार खात्याचे निमित्ताने काही तरी नवीन गोष्टी घडाव्यात असेही मत मुनगंटीवार यांनी मांडले. या सहकार खात्याचा विषयही या एका तासाच्या बैठकीचा भाग असू शकतो असे मुनगंटीवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीत नेमके काय झाले हे सांगता येणार नाही. महाभारतातल्या संजयचा अधिकार आपल्याला नाही आणि ते कौशल्यही नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, लोकसभा अधिवेशनाच्या अगोदर काही विषयांच्या संदर्भात कदाचित महाराष्ट्राच्या ज्या काही उणिवा किंवा त्रुटी आहेत आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने कारभार करते, त्या उणिवा आणि त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने
माननीय पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालावे यासाठीची ही बैठकअसू शकते. सहकार खाते स्वतंत्र केल्यावर नव्या गोष्टी घडवाव्यात आणि जुन्या गोष्टी विसराव्यात हीदेखील भावना असू शकते. या संदर्भात एक तास चर्चा झाली असावी. पण यातून नवीन सरकार, नवीन आघाडी जन्माला येईल असे दूरपर्यंत वाटत नाही. सरकार बनवण्याच्या हालचाली, ज्या बैठका होतात ट्विट करून कोणी सांगत नाही. सरकार बनवण्यासाठी ही भेट नक्कीच नाही. त्यामुळे सरकार जेव्हा बनायचे तेव्हा बनेल.