घरमहाराष्ट्रदेश विकलाय आता कुणाच्या प्रॉपर्ट्या विकताय; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

देश विकलाय आता कुणाच्या प्रॉपर्ट्या विकताय; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Subscribe

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षांची संपत्ती विकून शेतकऱ्यांना पैसे द्या, असं वक्तव्य केलं होतं. त्याला शिवसेनेचे खासादार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देश विकलाय आता कुणाच्या प्रॉपर्ट्या विकताय, अशी खरमरीत टीका राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस चांगले नेते आहेत. त्यांची सूचना चांगली आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा संपूर्ण देशात मोठा आहे. सात वर्षात जो देश विकलाय. संपूर्ण देशच उद्योगपतींना विकलेला आहे. केंद्र सरकारने अनेक सार्वजनिक उपक्रम, अनेक उद्योग एअर इंडियापासून नेल्को-बाल्को, विमानतळं सगळंच विकलं आहे, त्यातून शेतकऱ्यांना पैसे का देत नाही? अख्खा देशच विकला ना…आपल्या मर्जीतल्या दोन उद्योगपतींना! राहुल गांधी म्हणतात ते सत्य आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

देश विकल्यावर अजून काय विकायचं आहे, कुणाच्या प्रॉपर्ट्या विकताय? देशाची संपत्तीच तुम्ही विकली आहात. ती विकून जर तुमचं पोट भरलं नसेल तर अजून काय विकायचं आहे. शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही आमच्या गरिबांच्या खात्यात १५ लाख टाकणार होता, त्याचं काय झालं? असा सवाल देखील त्यांनी केला.

शिवसेनेचा विदर्भावर लक्ष

“संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. पण प्रामुख्याने विदर्भात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. २०२४ साली विधानसभेच्या निवडणुकीत मजबूतीनं आम्हाला उभं रहायचं असेल तर विधानसभेच्या ६५ जागा असलेल्या विदर्भात आम्हाला काम करावं लागेल. मोठ्या प्रमाणात आमचं काम सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काम सुरु आहे. उद्धव ठाकरे सुद्धा पक्षकार्यामध्ये ते स्वत: लक्ष घालतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण राज्यात लक्ष घालत आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव, कोरोनामुळे थोडी बंधणं होती, यातून आम्ही आता बाहेर पडलोय. संघटनात्मक बांधणीला प्राधान्य आहे, आणि ते आम्ही सुरु केलं आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेचं लक्ष गडकरी, फडणवीसांच्या नागपूरवर; आदित्य ठाकरे लवकरच नागपूर दौऱ्यावर जाणार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -