घरताज्या घडामोडीदिलासादायक! मुंबई महापालिकेचा पवई तलाव ओव्हरफ्लो

दिलासादायक! मुंबई महापालिकेचा पवई तलाव ओव्हरफ्लो

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव अद्याप २५ टक्केही भरलेले नाहीत. मात्र महापालिकेने १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधकेला 'पवई' हा कृत्रिम तलाव मंगळवारी संध्याकाळी ६१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव अद्याप २५ टक्केही भरलेले नाहीत. मात्र महापालिकेने १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधकेला ‘पवई’ हा कृत्रिम तलाव मंगळवारी संध्याकाळी ६१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची मात्र या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. (Mumbai Municipal Corporation’s Powai lake started overflowing)

मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव म्हणून पवई तलावाची ओळख आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य (क्षारयुक्त) नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक कामासाठी त्याचा वापर केला जातो.

- Advertisement -

गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

- Advertisement -
  • मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा पवई तलाव आहे.
  • महापालिकेने ४० लाख रुपये खर्चून या तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण केले.
  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे.
  • तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लिटर)
  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

हेही वाचा – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘एनडीआरएफ’च्या ९, तर ‘एसडीआरएफ’च्या ४ टीम सज्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -