घरमहाराष्ट्रमुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

मुंबई : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने अवघ्या ३२ दिवसांच्या कालावधीत १,००,२५९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला उत्स्फूर्त मिळाला आहे. ११ मार्चपासून सुरू झालेल्या या दोन्ही एक्सप्रेस ट्रेनने प्रवाशांच्या प्रतिसादामुळे ८.६० कोटींची महसूल जमा झाला आहे.

22225 मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील २६,०२८ प्रवासी संख्येतून २.०७ कोटी महसूलाची नोंद केली आहे, तर 22226 सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७,५२० प्रवासी संख्येतून २.२३ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

- Advertisement -

22223 मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील २३,२९६ प्रवाशांच्या संख्येतून २.०५ कोटी रुपयांची महसूलाची नोंद केली आहे, तर 22224 साईनगर शिर्डी – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून २३,४१५ प्रवाशांच्या संख्येतून रु.२.२५ कोटी महसूलाची नोंद केली.

वंदे भारत ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, GPS आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर पट्ट्या (concealed roller blindsblinds) यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत. जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यात अतिनील दिव्यासह उत्तम उष्णता वायुवीजन आणि वातानुकूलित यंत्रणा आहे. इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम हवामानाच्या परिस्थितीनुसार/ उपलब्ध संख्येनुसार कूलिंग समायोजित करते.

- Advertisement -

वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात १० मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवला होता. मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन आहे आणि मुंबई-साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील १०वी वंदे भारत ट्रेन आहे. या गाड्यांद्वाेर रेल्वेने आपल्या प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि हाय-स्पीड वाहतूक उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -