घरमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठाचा ६६.८० कोटींचा तूटीचा अर्थसंकल्प

मुंबई विद्यापीठाचा ६६.८० कोटींचा तूटीचा अर्थसंकल्प

Subscribe

८०९.२४ कोटींचा अंदाजित अर्थसंकल्प सिनेटमध्ये मंजूर

देशभरातील विद्यापीठांपैकी सर्वात श्रीमंत विद्यापीठ म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई विद्यापीठाने आपल्या आगामी आर्थिक वर्षांचा ८०९.२४ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सिनेटमध्ये मांडला. अवघ्या तीन वर्षांपूर्वी सरपल्स बजेट मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर यंदा पुन्हा एकदा विद्यापीठाने सुमारे ६६.९० कोटींचा तुटीचा अर्थकसंल्प यावेळी सादर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देत विविध भागांमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये विद्यापीठ उपपरिसरातील पायाभुत सुविधा (सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे), डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस, शैक्षणिक सुविधा (नविन अभ्यासक्रम व त्यासंदर्भातील उपक्रम), स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र, अपग्रेडेशन ऑफ आयसीटी इंफ्रास्ट्रक्चर, डिजीटल लायब्ररी, विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा नाविण्यपूर्ण बाबींवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थी केंद्रीत अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

वविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थीकेंद्रीत आणि सर्वसमावेशक असा 2020 – 21 सालचा 809.24 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. याबरोबरच 2020- 2021 या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला असून यामध्ये स्कुल ऑफ लँग्वेजेस इमारत (2 रा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (2 रा टप्पा), चतुर्थश्रेणी कर्मचा-यांकरिता निवासस्थान टाईप-2, नविन ग्रंथालय इमारत, नविन परिक्षा भवन, प्रो. बाळ आपटे दालन, मुलींचे नविन वसतिगृह, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (1 ला टप्पा), श्री. राजीव गांधी इमारत (2 रा टप्पा), वर्कशॉप इमारतीची दुरुस्ती, महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहाची दुरुस्ती, आय. टी. पार्क इमारत (आतील कामे) अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2020-2021 चा 809.24 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प डॉ. अजय भामरे, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, यांच्या उपस्थितीत अधिसभेच्या मान्यवर सदस्यांसमोर सादर केला. विद्यापीठाने या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी डॉ. अजय भामरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले होते, यामध्ये मा. कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिपक कुमार मुकादम, अधिसभा सदस्य मिलींद साटम, धनेश सावंत, डी.पी. मेहता, डॉ. कविता लघाटे, डॉ. रश्मी ओझा, डॉ. आरती प्रसाद, डॉ. महादेव गोंडा, डॉ. किन्नरी ठक्कर, साहेबराव घुले आणि वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांचा समावेश होता.

काय आहेत नव्या योजना आणि त्यासाठी तरतूद
1. विद्यापीठ उपपरिसरातील पायाभुत सुविधा (सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे) – 40.00 कोटी
2. डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस – 22.50 कोटी
3. शैक्षणिक सुविधा (नविन अभ्यासक्रम व त्यासंदर्भातली उपक्रम) – 10.00 कोटी
4. स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र – 9.00 कोटी
5. अपग्रेडेशन ऑफ आयसीटी इंफ्रास्ट्रक्चर – 5.00 कोटी
6. डिजीटल लायब्ररी – 5.00 कोटी
7. विद्यापीठ परिसराचे सुशोभिकरण – 5.00 कोटी
8. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह – 1.00 कोटी

- Advertisement -

या वर्षामधील नियोजित बांधकामे-

1. स्कुल ऑफ लँग्वेजेस इमारत (2 रा टप्पा)
2. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (2 रा टप्पा)
3. चतुर्थश्रेणी कर्मचा-यांकरिता निवासस्थान टाईप-2
4. नविन ग्रंथालय इमारत
5. नविन परिक्षा भवन
6. प्रो. बाळ आपटे दालन
7. मुलींचे नविन वसतिगृह,
8. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (1 ला टप्पा)
9. श्री. राजीव गांधी इमारत (2 रा टप्पा)
10. वर्कशॉप इमारतीची दुरुस्ती
11. महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहाची दुरुस्ती
12. आय. टी. पार्क इमारत (आतील कामे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -