घरमहाराष्ट्र'एलएलबी आणि एलएलएम'चा निकाल जाहीर

‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या 'एलएलबी आणि एलएलएम'चा निकाल जाहीर झाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी पदवीचे तीन वर्षीय अभ्यासक्रमाचे सत्र ०६ आणि एलएलएम २ वर्षीय अभ्यासक्रमाचे सत्र ०१ अशा दोन्ही अभ्यासक्रमांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. सदरचे निकाल मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mumresults.in वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

अवघ्या ३० दिवसात निकाल प्रक्रिया संपूर्ण

परीक्षेपासून ४५ दिवसात निकाल जाहीर करण्याची मुदत असते. परंतु विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांचा क्रियाशील सहभाग अचूक तसेच नियोजन आणि तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर या त्रिसुत्रीद्वारे अवघ्या ३० दिवसात निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट साध्य करता आले आहे.

- Advertisement -

बायोमेट्रिक अॅक्सेसचा अभिनव प्रयोग

लॉ विषयाच्या उत्तरपत्रिका तपासताना सर्व उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि मॉडरेशन ऑनस्क्रिन मार्कींग (OSM) पद्धतीने होते. परंतु यावेळेस सदर तंत्रज्ञानात बायोमेट्रिक अॅक्सेस या प्रयोगशील अभिनव तंत्राची जोड देण्यात आली. लॉं फॅकल्टीसाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक अॅक्सेस तंत्रज्ञानाचा वापर करताना सर्व ती खबरदारी घेण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे उत्तरपत्रिकांची मुल्यांकन प्रक्रिया ही व्यापकरित्या विकेंद्रित झाल्यामुळे कालमर्यादित उद्दिष्ट साध्या करता आले.

सदर एलएलबी तीन वर्षीय कोर्स सत्र
-VI या परीक्षेला एकूण ३ हजार ७७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकूण २ हजार ७६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७१.५९% एवढी आहे. तर एलएलएम दोन वर्षीय कोर्स सत्र-I या परीक्षेला एकूण ४०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकूण १४६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३६.४१% एवढी आहे. तसेच LLB पाच वर्षीय कोर्स सत्र-x या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल.

बायोमेट्रिक अॅक्सेस यासारख्या अभिनव प्रयोगशील तंत्रज्ञानाचा वापर हा निश्चितच अभिमानास्पद असून आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान अचूकपणे वापरण्याची मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची क्षमता सिद्ध करणारा आहे.  – डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

- Advertisement -

संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांचा सक्रीय सहभाग तसेच उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी बायोमेट्रिक अॅक्सेस तंत्रज्ञानाचा यशस्वी उपयोग करत ३० दिवसात निकाल जाहीर करण्याचे यश सामुहिक आहेडॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -