घरताज्या घडामोडीMumbai weather: मुंबईतील पारा घसरला, राज्यात थंडीचा कडाका वाढला

Mumbai weather: मुंबईतील पारा घसरला, राज्यात थंडीचा कडाका वाढला

Subscribe

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पालघर, मुंबईतील वातावारणात थंडावा जाणवेल. विदर्भात अद्यापही ढगाळ वातावरण असल्यामुळे तिकडे थंडीचा पाऱ्यात घसरण होण्यास थोडा वेळ लागेल.

राज्यात रविवारी दिवसभर आणि रात्रीसुद्धा थंडीचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने मुंबईत वातावरणाचा पारा घसरणार असल्याची शक्यता वर्तवली होती. वेधशाळेने सांगितल्यानुसार दोन दिवसांपासून थंडी जाणवत आहे. दोन दिवसांपुर्वी राज्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे वातावरणात बदल जाणवला. पावसानंतर राज्यात थंडीचा कडाका पडला आहे. मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. रात्रभर बाहेर असणाऱ्या टॅक्सी चालकांनी रस्त्यावर शेकोटी पेटवली होती. मुंबईमध्ये पारा १८ अंशापर्यंत खाली घसरला आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडी कायम असेल अशी शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.

राज्यात दोन दिवसांपुर्वी पाऊस पडल्यानंतर थंडीचा पारा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह विदर्भातही वातावरण थंडगार झाले आहे. थंडगार वातावरणाचा मुंबईकरांनीसुद्धा अनुभव घेतला आहे. मुंबईतील पारा १८ अंशावर आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये बर्फ वृष्टी झाल्यामुळे राज्यात थंड वारे वाहू लागले आहेत. पुढील तीन दिवस राज्यातील तापमानाचा पारा घसरलेला असणार आहे. अवकाळी पावसामुळे वातावरण ढगाळ झाले होते. महाबळेश्वरमध्ये १२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

- Advertisement -

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पालघर, मुंबईतील वातावारणात थंडावा जाणवेल. विदर्भात अद्यापही ढगाळ वातावरण असल्यामुळे तिकडे थंडीचा पाऱ्यात घसरण होण्यास थोडा वेळ लागेल. सातारा आणि महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली असल्यामुळे पर्यटकांना गुलाबी थंडीचा अनुभव आला आहे. मुंबईत रविवारी सांताक्रूझमध्ये २६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान दुसऱ्यांदा नोंदवण्यात आले असून पहिल्यांदा २०१५ मध्ये सर्वाधिक कमी २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जानेवारी महिन्यात करण्यात आली होती.


हेही वाचा : ST bus accident in Beed: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -