घरमहाराष्ट्रमाझं ट्विट आणि शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी; नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

माझं ट्विट आणि शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी; नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकलं, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या आरोपांना माझं ट्विट पुरेसं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे. तसंच, आमदार आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा त्याला जास्त काही वजनही नाही आहे. त्यामुळे त्याला कशाला वजन देता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

१४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटा ज्या पकडण्यात आल्या. त्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकला. बीकेसीमध्ये (८ ऑक्टोबर २०१७) बोगस नोटांचे कनेक्शन आयएसआय, पाकिस्तान व्हाया बांग्लादेश यांच्यामार्फत बोगस नोटा संपूर्ण देशात पसरवल्या गेल्या. ८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले. मुंबईत एकाला अटक झाली. एकाला पुण्यात अटक करण्यात आली. त्यामध्ये इम्रान आलम शेख, रियाज शेख यांची अटक झाली. नवीमुंबईमध्येही कारवाई झाली. पंरतु १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांमधून ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले.

पाकिस्तानची बोगस नोट भारतात चालावी? प्रकरण दाखल होते आणि काही दिवसातच जामीन मिळतो. हे प्रकरण NIA कडे दिले जात नाही. नोटा कुठून आल्या. याची अंतिम चौकशी झाली नाही. कारण जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

विधान परिषदेसाठी उमेदवार लवकरच जाहीर करणार

विधान परिषदेची निवडणूक घोषित झोली आहे. भाजपची राज्य निवडणुकीची कमिटी आहे त्याची लवकर मिटींग घेऊ. त्या मिटींगमध्ये भाजपचे उमेदवार कोण असतील ते आम्ही ठरवू तशी शिफारस दिल्लीत पाठवू. संसदीय मंडळ आणि आमचे अध्यक्ष ते त्याला मान्यता देतील. नुकतीच घोषणा झाली आहे, थोडी वाट बघा, असं फडणवीस म्हणाले.

एसटी संप; सरकारची भूमिका असंवेदनशील

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिका असंवेदनशील आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. हा संप चिघळू नये असं आम्हाला देखील वाटतं. परंतु दमनशाहीच्या भरवश्यावर, लोकांवर कारवाई करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल तर ते आंदोलन वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना काहीनाकाही दिलासा सरकारने दिला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -