नागपूरकरांनो सावधान, कोरोनाच्या व्हेरियंट बी ए 5 चे दोन रुग्ण, तर २५३ जण पॉझीटीव्ह

मुंबई पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. सध्या नागपुरात ओमीक्रॉनचे व्हेरियंट बी ए 5 चे दोन रुग्ण आढळले आहेत.

nagpur corona test

मुंबई पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. सध्या नागपुरात ओमीक्रॉनचे व्हेरियंट बी ए 5 चे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे सर्दी खोकला ताप अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि टेस्ट कराव्यात असे आवाहन नागपूर महापालिकेने नागपूरकरांना केले आहे. तसेच साठ वर्षावरील व्यक्तींनी बूस्टर डोज (Booster Dosage) घ्यावेत असेही पालिका आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan b) यांनी नागरिकांना सांगितले आहे.

नागपूरमध्ये सध्या कोरोनाचे २५३ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच एकीकडे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच कोरोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहेत. यात शहरात १६९ ग्रामीण भागात ८० आणि जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील २५० जण होम क्वारनटाईन असून घरातच उपचार घेत आहेत. दरम्यान कोरोना रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी दुसरीकडे मृत्युचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. मात्र कोरोना अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन वारंवार वैद्यकिय तज्त्रांकडून केले जात आहे.