घरमहाराष्ट्रकल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार पार

कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार पार

Subscribe

वाढती रुग्णसंख्या काळजी वाढवणारी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी सर्वाधिक ४३६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ५ हजारावर पोहचल्याने चिंता अधिकच वाढली आहे. कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाची स्थिती हळूहळू हाताबाहेर जात असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दिवसागणिक आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा शंभरवरून आता चारशेपार झाला आहे. त्यामुळे रुग्णाची वाढती संख्या काळजीत टाकणारी ठरत आहे. शनिवारी केंद्रीय पथकाने ठाण्यात येऊन पाहणी दौरा केला यावेळी जिल्ह्यातील सर्वच महापालिकासह कल्याण डोंबिवली महापालिकेतील वाढत्या रुग्णांची माहिती घेतली. प्रशासनाने घाबरून न जाता चाचण्याची क्षणात वाढवून मृत्यू दार कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना सर्व आयुक्तांना सूचना केल्या.

केडीएमसी क्षेत्राचा कोरोना बाधित आकडा शनिवारी ५ हजार ३०९ वर पोहचला. सध्या ३ हजार ७९ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे तर २ हजार १२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. केडीएमसी मधील कंटेंटमेंट झोनमधील सर्व ठिकाणे सील करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. तसेच लॉकडाऊन कडक करण्यासाठी एसआरपीएफची मदत घेण्यासाठी पोलीस प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाला युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या लागणार आहेत अन्यथा परिस्थिती आणखीच गंभीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना नियंत्रणासाठी ‘केडीएमसी’ची प्रतिबंधित क्षेत्र कोरोना कमिटी गठित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -