घरमहाराष्ट्रनागपूरवाजपेयी, अडवाणी, उपाध्यायांसह इतर नेत्यांमुळेच मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार - नितीन गडकरी

वाजपेयी, अडवाणी, उपाध्यायांसह इतर नेत्यांमुळेच मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार – नितीन गडकरी

Subscribe

नागपूरमधील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणइ पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने त्यांच्या एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी हे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतर आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली, असे वक्तव्य मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नितीन गडकरी काय म्हणाले –

- Advertisement -

काही काळापूर्वी पक्षाची स्थिती खूप बिकट होती. मात्र, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भरपूर कामे केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आल्याचे गडकरी म्हणाले. पुढे त्यांनी मी पहिल्यांदा मुंबईतील भाजप कार्यालयात गेलो होतो तेव्हा कार्यालयाची दयनीय अवस्था होती. तेव्हा मावळत्या सूर्याला पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा, असे वक्तव्य केले होते आणि आज त्यांचे वक्तव्य खरे ठरले कारण जनतेने आम्हाला साथ दिली, असे गडकरी म्हणाले.

सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार –

- Advertisement -

गडकीर म्हणाले की, जसे कार्य आपण राजकीय क्षेत्रात केले आहे. तसेच कार्य सामाजिक क्षेत्रातही करण्याची गरज आहे. संघ प्रणित एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक या नात्याने तुम्ही सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार असा विश्वास असल्याचे गडकरी म्हणाले.

आपल्या प्रयत्नातून आपण गरीबी, भूखबळी, बेरोजगारीतून आपण मुक्त होऊ. आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनू. आदर्श समाजाचे एक अंग आपण बनाल आणि देशाचे जबाबदार नागरिक बनून कार्य कराल. निश्चितपणे आपण देशाच्या नागरिकांना अभिमान वाटेल असे काम कराल. आता तो दिवस दूर नाही, लवकरच हा दिवस येईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -