घरताज्या घडामोडीनाना पटोलेंकडून पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचा उलगडा, म्हणाले...

नाना पटोलेंकडून पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचा उलगडा, म्हणाले…

Subscribe

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा खुलासा कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी कॉंग्रेसचे नेते कोणत्या कारणासाठी गेले होते, याबाबतचा खुलासा केला आहे. पण शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मला निमंत्रण नव्हते, असेही स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले. माझे कोणाशीही वैमनस्य नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठीच्या नेमणूकीबाबतही नाना पटोले यांनी आपले मत मांडले आहे.

म्हणून शरद पवारांच्या घरी झाली बैठक

भाजपने ओबीसी आरक्षण हे संपुर्ण महाराष्ट्रात संपवले आहे. त्यामुळेच येत्या दिवसांमध्ये मोठे ओबीसी आरक्षणाबाबतचे आंदोलन उभे करण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. या आंदोलनाची माहिती सहकारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यासाठी आमच्या पक्षाचे महाराष्ट्रातील प्रभारी एच के पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते. येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात कॉंग्रेसची ताकद वाढवायची आहे. देशात आता भाजपला कॉंग्रेसचाच पर्याय आहे. तसेच देशातील जनतेनेही राहुल गांधी यांचे नेतृत्व स्विकारले आहे. म्हणूनच ज्या कॉंग्रेसने देशाला वाईट काळात उभे केले, त्याच कॉंग्रेसचा पर्याय आम्ही देशवासीयांना देऊ पाहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्राची व्यक्ती राष्ट्रपती होत असेल तर आनंदच

राष्ट्रपदी पदासाठीची नेमणुकीची नेमकी काय प्रक्रिया आहे हे मला माहित नाही, पण महाराष्ट्रातील व्यक्ती जर राष्ट्रपती होत असेल तर मला आनंदच आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठीच्या नेमणुकीच्या चर्चेवर बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की त्यांना जर या पदावर नेमणुक मिळत असेल तर त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. शरद पवार किंवा कोणासोबतच माझे वैमनस्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -