घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं...

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

Subscribe

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवार) तिसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आंदोलनामध्ये भाजपचे आमदार संजय केळकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे. ओबीसींना आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांची वीडतोडणी चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

एसटी कर्मचारी, ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांची वीजतोडणी याबाबत विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जवळपास दीड महिना पूर्ण झाला आहे. तरीदेखील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे राज्यातील काही भागांत अद्यापही सुरूच आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या निलंबन प्रक्रियेला सुद्दा सूरूवात झाली आहे. निलंबनाच्या प्रक्रियेला सुरूवात होऊन जवळपास दोन आठवडे पूर्ण झाले असून एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणबाबत सरकारवर हल्लाबोल

ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याबाबत आणि शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करून त्यांना नाहक त्रास दिला जातोय, असं भाजपाच्या आमदारांचं म्हणणं आहे. तर ओबीसी आरक्षणावरून देखील विधानसभेत प्रचंड मोठा गदारोळ पहायला मिळाला. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्योराप होताना दिसत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजेच काल (गुरूवार) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं. यामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. विजेची देयके भरणे, ओबीसी आरक्षण, आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षातील नेत्यांकडून आंदोलनं करण्यात आली.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील – सुधीर मुनगंटीवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -