घरमहाराष्ट्रनागपूरNarendra Modi : मोदींचेच सरकार पुन्हा का? स्वतः पंतप्रधानांनीच सांगितले कारण

Narendra Modi : मोदींचेच सरकार पुन्हा का? स्वतः पंतप्रधानांनीच सांगितले कारण

Subscribe

दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात सभा झाल्यानंतर आज (ता. 10 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपुरातील रामटेकमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी त्यांचेच सरकार पुन्हा का येणार? याची कारणे सांगितली

नागपूर : देशभरात लोकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरे केले असून आता देखील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी सभा घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात सभा झाल्यानंतर आज (ता. 10 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपुरातील रामटेकमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी त्यांचेच सरकार पुन्हा का येणार? याची कारणे सांगितली. जेव्हा मला विरोधकांकडून सर्वाधिक शिव्या देण्यात येतील. तेव्हा समजून का पुन्हा मोदींचीच सत्ता येणार आहे, असे पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. (Narendra Modi said the reason for coming back to power)

नागपूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे उमदेवार नितीन गडकरी आणि शिवसेनेचे रामटेकचे उमदेवार राजू पारवे यांच्या समर्थनात प्रचार सभा पार पडली. या सभेतून पंतप्रधान मोदी यांनी इंडि आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी यावेळी स्वतःच तिसऱ्यांदा कसे काय विजयी होणार? याबाबतची माहिती दिली. तर, मीडियावाल्यांनी सर्वेक्षणात आपला पैसा खर्च न करता घडत असणाऱ्या गोष्टीवरूनच त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांना सोपा उपाय सांगितला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांतील कामांचा जगभरात प्रभाव – फडणवीस

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकीबाबत मीडियाकडून सर्व्हे दाखवला जात आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून ते एनडीएचा भरघोस मतांनी विजय होणार असल्याचे सांगत आहेत. पण मीडियाने सर्व्हेच्या मागे इतका न करता, मी त्यांना यासाठी सांगत असलेला फॉर्म्युला वापरावा. मोदीला जेव्हा जास्त शिव्या पडू लागतात, तेव्हा समजायचे की पुन्हा मोदी जिंकून येणार. जेव्हा विरोधक माझ्या आई-वडिलांबद्दल मला अपशब्द बोलतात, तेव्हा समजून जायचे की पुन्हा एकदा मोदी सरकार येणार. जेव्हा ईव्हीएम प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा समजून जायचे की पुन्हा एकदा मोदीचेच सरकार येणार, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणातून मतदारांना भाजपाला, महायुतीच्या उमेदवारांना आणि एनडीएला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 19 एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही तर पुढच्या एक हजार वर्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय एकतर्फी, विश्वजीत कदमांनी व्यक्त केली खंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -