घरमहाराष्ट्रSanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही... निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

Sanjay Gaikwad : मी बंड केलेलं नाही… निवडणूक लढणारच; गायकवाडांकडून भूमिका स्पष्ट

Subscribe

मुंबई : शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकी पहिल्या 8 उमेदवाराची पहिली यादी शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केली. या यादीत प्रतापराव जाधव यांना बुलढाण्यातून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्याआधीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी दुपारीच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाले आहे. प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी संजय गायकवाड आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असं वक्तव्य केलं आहे. मात्र संजय गायकवाड यांनी म्हटले की, मी बंड केलेलं नाही, त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे, असे म्हणत ते आपल्या उमेदवारी ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. (I have not rebelled Will contest elections Role clear from Sanjay Gaikwad)

हेही वाचा – Loksabha 2024: श्रीनिवास पाटील यांची माघार; शरद पवार करणार नव्या उमेदवाराची घोषणा

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड बोलताना म्हणाले की, “मी निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं अर्ज दाखल केला आहे. लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज मी अचानकपणे दाखल केलेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही. मी बंड केलेलं नाही, त्यामुळे आता चार तारखेनंतर काय होतं ते कळेल. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा पहिला दिवस होता. मी आधीपासूनच ठरवलेलं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचं आहे. फक्त दरवेळी मी पाच-पन्नास हजार लोकं सोबत घेऊन जातो आणि उमेदवारी अर्ज दाखल करतो. मात्र यावेळी फक्त पाच जणांसोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी खंतही संजय गायकवाड यांन यावेळी बोलून दाखवली.

हेही वाचा – Shubha Khote : अलविदा, सोबती…60 वर्षांचा सहवास संपला, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन

- Advertisement -

माझा अर्ज अजूनतरी कायम

संजय गायकवाड म्हणाले की, जे समाजात काम करत नाही, ज्यांना लोकं ओळखत नाहीत, असे लोक निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र मी चोवीस तास लोकांसाठी काम करत असतो. राज्यभर काम करतो. मी चोवीस तास काम करत असतो, असे म्हणत संजय गायकवाड यांनी प्रतापराव जाधव यांच्या भेटीबाबत भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत अद्याप काहीच ठरलेलं नाही. प्रतापराव जाधव आणि माझी भेट झाली, मात्र आमच्यात उमेदवारी मागे घेण्याबाबत काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे अजूनतरी माझा अर्ज कायम आहे आणि मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांना दिसेलच असं सूचक वक्तव्यही संजय गायकवाड यांनी यावेळी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -