घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविस्तारात नाशिकचा मंत्री; बावनकुळेंचे संकेत

विस्तारात नाशिकचा मंत्री; बावनकुळेंचे संकेत

Subscribe

नाशिक : नाशिक महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात भाजपला स्पष्ट बहुमताची मिळालेली सत्ता आणि शहरांमधून सलग दोन वेळा भाजपाचे आमदार निवडून दिल्याची नक्कीच दखल मंत्रिमंडळ विस्तारात घेतली जाईल. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव देण्याचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शहर व जिल्हा कोअर कमिटीची बैठक रविवारी (दि.11) नाशिकमध्ये घेतली. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चाचपणी त्यांनी केली. भविष्यात नाशिकला ताकद देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत त्यांनी चर्चा केली. नाशिक जिल्ह्यातून भाजपाला 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळाले. महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता देखील आली. शहरात सलग दुसर्‍यांदा भाजपाचे आमदार निवडून येण्याची मोठी घटनाही घडली.जाहीर भूमिका नाही. मात्र, या बदल्यात भाजपाकडून नाशिकला मंत्रिपद दिले जात नसल्याबाबत बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाशिकचा नक्कीच विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान द्यायचे याबाबत निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून मी केवळ नावे सुचवणारा असल्याचे सांगत त्यांनी थेट भूमिका जाहीर केली नाही. मंत्रीपदासाठी महिला आमदार म्हणून विचार झाल्यास देवयानी फरांदे व सीमा हिरे यांचा दावा असेल. युवा तसेच मराठा बहुजन चेहरा असा विचार केल्यास चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर व नाशिकचे आमदार अ‍ॅड.राहुल ढिकले यांची नावे आघाडीवर आहेत. या चौघांपैकी कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

भाजपामध्ये फेरबदल शक्य

नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर भाजप शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक कार्यकारणीतील फेरबदलाकडे लक्ष लागून होते. या संदर्भात विचारले असता बावनकुळे यांनी जानेवारीअखेर संघटनात्मक निवडणुका होतील असे संकेत दिले आहेत. यानंतर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. इतर पक्षांप्रमाणेच दोन जिल्हाध्यक्ष दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

गोदावरी प्रकल्प फास्टट्रॅकवर

महापालिकेत भाजपची सत्ता असताना निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, गोदावरी नदी शुद्ध ठेवण्यासाठी 1800 कोटी रुपयांच्या नमामी गोदावरी अशा रखडलेल्या प्रकल्पांची माहिती या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देऊन हे सर्व प्रकल्प फास्टट्रॅकवर कसे आणण्यासाठी पाठपुरावा करणार असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -