त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण; त्यादिवशी नेमकं काय घडलं? नितेश राणेंनी सांगितलं सविस्तर

मंदिराच्या आवारातून ऊरुस निघाला होता यावेळी एका विशिष्ट धर्माच्या, जिहादी लोकांनी मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. तसचं, धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नसल्याचं गावकरी, विश्वस्त मंडळ आणि जाणकारांचं म्हणणं असल्याचं, भाजप नेते नितेश राणे यांनी सांगितले आहे.

Nashik Trimbakeshwar Temple case now Nitesh Rane told what happened happened on that day
Nashik Trimbakeshwar Temple case now Nitesh Rane told what happened happened on that day

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्माच्या लोकांच्या जमावाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या मंदिराच्या आवारातून ऊरुस निघाला होता यावेळी एका विशिष्ट धर्माच्या, जिहादी लोकांनी मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. तसचं, धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नसल्याचं गावकरी, विश्वस्त मंडळ आणि जाणकारांचं म्हणणं असल्याचं, भाजप नेते नितेश राणे यांनी सांगितले आहे. राणे आज, 23 मे रोजी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.(  Nashik Trimbakeshwar Temple case now Nitesh Rane told what happened happened on that day )

काय म्हणाले नितेश राणे?

एक मंत्री म्हणून नाही तर एक हिंदू म्हणून मी आज त्र्यंबकेश्वर मंदिरात आरती करण्यासाठी आलो आहे. कुठल्याही परिस्थितीत या भागातील शांतता भंग करण्याचा आमचा हेतू नाही. परंतु 13 मे रोजी जी घटना घडली त्याबाबत आता सातत्याने गैरसमज पसरवले जात आहेत. हिंदूंना बदनाम करण्याचा हा सर्व प्रकार सुरु आहे. त्या सगळ्या प्रकरणांबाबत गावकरी आणि विश्वस्तांच्या सांगण्यावर आम्ही येथे आलो आहोत, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

ही वर्षानुवर्षांची परंपरा नाही – नितेश राणे

त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा असल्याचं जे बोललं जात आहे. ते साफ चुकीचं आहे. याबाबत विश्वस्त , गावकरी आणि जाणकार यांच्याशी आम्ही बोललो आहोत. या मंदिरात जिहादी वृत्तीच्या लोकांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टोप्या घातल्या होत्या तसचं त्यांच्या हातात हिरवे झेंडे ही होते. मंदिर बंद असताना मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न हे युवक करु लागले.

अनेक वर्षांपासून येथून ऊरुस निघतो. ते मंदिराच्या बाहेर काय करतात याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. परंतु ते जर मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करतील तर ते हिंदू सहन करणार नाही, असं म्हणत राणेंनी नेमकं त्यादिवशी काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.