घरमहाराष्ट्रनाशिकबोकड बळी विरोधात उपोषणाचा इशारा .

बोकड बळी विरोधात उपोषणाचा इशारा .

Subscribe

पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक :  सप्तश्रृंगी गडावर दसर्याच्या दिवशी बोकड बळीची प्रथा आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता न्यायालयाने या प्रथेला काही अटी शर्थीवर सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सप्तशृंगी गडावरील बोकड बळी प्रथा बंद करण्यात यावी, न्यायालयाने निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी दिला आहे. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 या निर्णयाचा महंत अनिकेत शास्त्री महाराज व इतर साधू महंतांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रथा परंपरानुसार सप्तश्रृंगी गडावर विजयादशमीचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पार पाडण्यात येणार आहे. तब्बल पाच वर्षानंतर बोकड बळी प्रथा सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. मात्र बोकड बळी प्रथेला साधू महंताचा विरोध असून नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी आमरण उपोषणचा इशारा दिला असून रामकुंडावर आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

- Advertisement -

धर्मशास्रात कुठेही पशुबळीचा उल्लेख नाही किंवा पशुबळी दिल्याने देवता प्रसन्न होते, असेही कुठे नमूद करण्यात आले नाही. त्यामुळे सप्तशृंगी गडावरील बोकड बळी प्रथा बंद करण्यात यावी. न्यायालयाने निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल.
महंत अनिकेत शास्त्री महाराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -