घरमहाराष्ट्रनाशिक११ हजार केव्हीची वीजवाहिनी रस्त्यावर

११ हजार केव्हीची वीजवाहिनी रस्त्यावर

Subscribe

विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मोठी जिवीतहानी टळली

वावरेनगर परिसरातील कार्तिकेय नगर येथील मुख्य रस्त्यावर महापारेषणच्या खांबावरील इन्सुलेटरचा स्फोट होऊन ११ हजार केव्हीची उच्च विद्युत वाहिनी तुटून थेट रस्त्यावर पडली. सुदैवाने, विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मोठी जिवीतहानी टळली.

ही केबल मुख्य रस्त्यासह परिसरातील अनेक घरांवर पडली. त्यावेळी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतुकही सुरू होती. वीज पुरवठा खंडित झाला नसता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष प्रदीप पेशकर व सरचिटणीस अशोक पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने दोन्ही बाजुंनी रस्त्यावरची वाहतूक बंद करून विद्युत पारेषणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने केबल हटविण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -