घरमहाराष्ट्रनाशिकअकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता जाहीर;14 हजार 845 विद्यार्थ्यांची निवड

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता जाहीर;14 हजार 845 विद्यार्थ्यांची निवड

Subscribe

विज्ञान शाखा 91 टक्के, वाणिज्यचा 88 टक्के कटऑफ

दहावी परीक्षेचा निकाल घसरला असताना अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच गुणवत्ता यादीने उच्चांक गाठला आहे. विज्ञान शाखेच्या खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक 91 टक्के तर वाणिज्य शाखेसाठी 87.80 टक्के एवढा कट ऑफ जाहीर झाला आहे. कला शाखेसाठी 66 टक्के कट ऑफ जाहीर झाला आहे. शहरातील प्रमुख पाच महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचे पहिल्या गुणवत्ता यादिवरून स्पष्ट झाले आहे.

शहरात अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखांच्या मिळून एकूण 23 हजार 860 जागा उपलब्ध आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीसाठी 25 हजार 690 प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 14 हजार 845 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -