घरमहाराष्ट्रनाशिककेबीएच दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

केबीएच दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

जिल्ह्यात ६९१ सक्रीय रुग्ण

नाशिक : पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला त्यांना वसतिगृहातच विलगीकरण करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२) दिवसभरात ११७ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर ७१, नाशिक ग्रामीण ३६, मालेगाव आणि जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी ५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही .

नाशिक जिल्ह्यात ४ लाख १४ हजार २१७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ४ लाख ४ हजार ७७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ८ हजार ७५६ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहर ४ हजार २५, नाशिक ग्रामीण ४ हजार २४७, मालेगाव ३५८ आणि जिल्ह्याबाहेरील १२६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ६९१ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक शहर ४३८, नाशिक २३२, मालेगाव १० आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. कोरोनाचा नवा व्हेरियट असलेल्या ओमायक्रॉयने नाशिक शहरात शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रण सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -