घरदीपोत्सवदिवाळीमुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरुप

दिवाळीमुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरुप

Subscribe

दिवाळी खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे मध्यवर्ती बाजारपेठांना यात्रेचे स्वरुप

प्रियंका भुसारे

नाशिक : दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे मध्यवर्ती बाजारपेठांना यात्रेचे स्वरुप आले आहे. मेनरोड, दहीपूल भागांत तर पायी चालणेही अवघड बनल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळीत या भागांत चारचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

दिवाळीसाठी कपडे, आकाशकंदील, फटाके, रंग, रांगोळी, केरसुणी, किराणा, फराळाचे पदार्थ, मिठाई, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, महात्मा गांधी रोड, धुमाळ पॉइंट ते दहीपूल असा हा संपूर्ण भाग मध्यवर्ती बाजारपेठेत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगलाच बिकट बनला आहे.

 दरम्यान, शालिमार, मेनरोड, महात्मा गांधीरोड या भागांत गर्दीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिकांना पायी चालणेदेखील कठीण बनले असताना अनेक नागरिक गर्दीच्या ठिकाणी मोठी वाहने घेऊन जातात. त्यामुळे पादचार्‍यांचा कोंडमारा होतो. त्याचबरोबर वाहतूकदेखील ठप्प होते. या भागातील काही रस्ते पार्किंग, अतिक्रमणांमुळे तर काही रस्ते मुळातच अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट बनला आहे.

- Advertisement -

 त्यामुळे किमान दिवाळीत मोठ्या वाहनांना बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिककरांनी या भागात वाहने आणणे टाळावे अन्यथा पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणी वाहने लावून बाजारपेठांत जावे, अशी मागणी ग्राहकांकडून केली जाते आहे. खरेदीमुळे बाजारपेठा लकाकल्याने व्यापार्‍यांमध्येही चैतन्याचे वातावरण आहे. त्यातील कोंडीचे विघ्न दूर करण्याची मागणी होत आहे.

बाजारपेठांमध्ये अरुंद रस्ते असलेल्या चौकांमध्ये वाहने नेण्यास निर्बंध लावण्याची गरज आहे. शक्य तेथे पार्किंगच्या सोयी उपलब्ध करून दिल्यास नाशिककर ग्राहकांना होणारा मनस्ताप कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर लोकांनीदेखील काळजी करून चारचाकी वाहने गर्दीच्या ठिकाणी नेण्याचे टाळावे.
– संदीप जाधव, ग्राहक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -