घरमहाराष्ट्रनाशिकटोईंगविरोधात उद्या आपचे आंदोलन

टोईंगविरोधात उद्या आपचे आंदोलन

Subscribe

शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दया

नाशिक :  शहरातील नो पार्किंगमधील वाहनांवर पोलीस आयुक्तालयाकडून नियुक्त ठेकेदारामार्फत टोईंगची कारवाई केली जाते. मात्र, शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा नसताना अशाप्रकारे नाशिककरांचे होत असलेले आर्थिक शोषण तातडीने थांबावे, असा इशारा देत आम आदमी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मोहिमेविरोधात उदया गोल्फ क्लब मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना नाईलाजास्तव रस्त्याकडेला कुठेतरी गाडी पार्क करावी लागते. अनेकदा वाहतुकीला कोणताही अडथळा नसतानादेखील टोईंग एजन्सीमार्फत काही क्षणातच कायद्याचा धाक दाखवत गाडी उचलली जाते. यामुळे नाशिककरांना मनस्ताप होतो. त्याचबरोबर मोठा आर्थिक भुर्दंडदेखील बसतो. अनेकदा वाहने टोईंग करताना वाहतूक पोलीस तसेच, टोईंग व्हॅन कर्मचार्‍यांसोबत वादाचे प्रसंगदेखील उदभवतात. अनेकदा तर हे प्रकरण हातघाईवर गेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. काहीवेळा तर गाडी उचलताना टोईंग एजन्सीमार्फत त्या गाडीचे नुकसान झाल्याच्यादेखील अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत.

- Advertisement -

वाहनांचा दंड भरताना दिलेली पावती गेटवरच परत घेतली जाते. वाहन टोईंगच्या माध्यमातून नाशिककरांची लुटमार सुरू असून, याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. आधी पार्किंगसाठी वाहनधारकांना पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी करत आम आदमी पक्षाने सोमवारी (दि.१२) आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमीचे नेते जितेंद्र भावे, नाशिक मध्य आणि पश्चिम विधानसभाचे अध्यक्ष राजेंद्र गायधनी, विलास देसले, कलविंदर गरेवाल, समाधान आहिरे, दिनकर पवार, अ‍ॅड. पुष्पा ढवळे, अ‍ॅड. राजेंद्र हिंगमिरे, नितीन रेवगडे, प्रसाद घोटेकर, चैतन्य सहाने, अजय गायकवाड, प्रियांका पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -