घरमहाराष्ट्रनाशिकसिन्नरमध्ये ब्रेकफेल ट्रकने केला आठ वाहनांचा चुराडा

सिन्नरमध्ये ब्रेकफेल ट्रकने केला आठ वाहनांचा चुराडा

Subscribe

सकाळची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला, घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला.

शहरातील सिन्नर महाविद्यालयासमोर ब्रेक फेल अवजड ट्रकने आठ वाहनांना चिरडल्याची घटना रविवारी (दि.18) सकाळी घडली. या अपघातात पाच चारचाकींसह तीन दुचाकींचा समावेश आहे. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला.

रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नाशिकहून शिर्डीकडे राख घेऊन जाणारा नाशिकरोड येथील काळे कंपनीचा हायवा ट्रक (एमएच 15 इजी 9142) सिन्नरमधून जात असताना सिन्नर महाविद्यालयाजवळील स्पिडब्रेकरवर चालकाने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्रेक फेल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. ट्रकच्या पुढे एक बोलेरो गाडी असल्यामुळे या गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक चहाच्या टपरीला उडवून शेजारीच असलेल्या चारचाकी व दुचाकीच्या गॅरेजमध्ये घुसली. चहाची टपरी ते गॅरेज या जवळपास 100 फूट अंतरावरील वाहनांचा चुरडा करत ट्रक गॅरेजमध्ये घुसली.

- Advertisement -

सुरुवातीला इनोव्हा कारला धडक देऊन पद्मा साक्री यांच्या टपरीला नेस्तनाबूत करत टपरीशेजारील तीन दुचाकींचा चक्काचूर करत ट्रकने या दुचाकींना फरफटत नेले. गॅरेजजवळील चार चारचाकी वाहनांना धडक देत शेवटी ट्रक गॅरेजवर धडकली. नुकसानग्रस्त वाहनांत शेवरोले, मारुती कार, एन्जॉय कार, स्कोडा व इंडिका या कारचा समावेश आहे.

अपघातानानंतर सिन्नर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले. तसेच, फरार चालकाचा शोध सुरू केला. वाहनाचे मूळ मालक काळे हे घटनास्थळी उपस्थित राहिल्याने असल्याने पुढील तपास करणे पोलिसांना सुकर झाले. अधिक तपास सिन्नर एएसआय परदेशी व हवालदार विनोद टिळे करत आहे.

- Advertisement -

मोठी जीवितहानी टळली

सिन्नर महाविद्यालयासमोर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. महाविद्यालयासमोर अनेक दुकाने, बँक, गॅरेज, हॉटेल इ. दुकाने असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगारवर्ग मोठ्या प्रमाणावर येत असतो. मात्र, अपघातप्रसंगी सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी लोकांची गर्दी नव्हती. चहाच्या टपरीवरील पद्मा साक्री व इतर एक दोन व्यक्ती होते. मात्र त्यांच्या अगदी फूटभर अंतरावरुन ट्रक वाहनांना चिरडत गेल्याने ते यातून सुखरूप वाचले. मात्र, त्यांची टपरी पूर्णपणे उध्वस्त झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -