घरमहाराष्ट्रनाशिकशहरबसला सीसीटीव्ही, क्यूआर कोडचे कवच

शहरबसला सीसीटीव्ही, क्यूआर कोडचे कवच

Subscribe

महापालिकेची शहर बससेवा येत्या 1 जुलैपासून सुरु

महापालिकेची शहर बससेवा येत्या 1 जुलैपासून सुरु होत असल्याने मंगळवारी (दि.22) शहरात या गाड्यांची ‘ट्रायल’ घेण्यात आली. अत्याधुनिक सुविधा असलेल्या या बसेसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे, बस स्टॉपवर स्कॅन होण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. त्यामुळे बस चालकांना प्रत्येक स्टॉपवर थांबणे बंधनकारक राहणार आहे.

शहर बससेवा सुरु होण्यापूर्वी त्याची प्रायोगिक तत्त्वावर पडताळणी करण्यात येत आहे. दहा बसेसद्वारे तपोवन ते बारदान फाटा, भगूर बोरगड, पाथर्डी गाव, सिम्बॉयसिस कॉलेजपर्यंत प्रथमच या बसेस धावल्या. शहर बसेचा रंग, स्वरुप अगदी वेगळेच असल्यामुळे त्यात बसण्यासाठी नागरिकांनी निमाणी बसस्थानकात गर्दी केली होती. परंतु, प्रायोगिक तत्त्वावर या बसेस धावत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. गाडीचा दरवाजा उघडा राहिल्यास दरवाजा बंद करण्याची सूचना देणारा आवाज गाडीत येतो. तसेच पुढील स्टॉप कोणता असेल, याविषयी प्रवाशांना आगाऊ सूचना मिळेल. त्यामुळे कंडक्टरला स्वतंत्र सांगण्याची गरज भासणार नाही. कंडक्टरकडे असलेले तिकिट मशिन हे ऑनलाईन कनेक्ट राहणार असल्याने त्यात स्टॉपचे नाव टाकताच तिकिट दर निश्चित होईल. तसेच दिव्यांग व्यक्तिंना तिकिट दरात सवलत देण्यात आली असून, अंध व्यक्तिसोबत एका व्यक्तिला सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

या ठिकाणी धावल्या बसेस

शहरात मंगळवारी (दि.22) प्रायोगिक तत्त्वावर दहा बसेस विविध मार्गावर धावल्या. त्यांचे ऑनलाईन ट्रॅकिंग करण्यात आले. बसेस वेळेवर पोहोचतात का? प्रत्येक बस स्टॉपवर थांबतात का? याची पडताळणी करण्यात आली.
शहर बससेवा सुरु करण्यास एसटी महामंडळातर्फे आम्ही परवानगी दिली आहे. आमचे कर्मचारी त्यांना मदत करत असून, बससेवा सुरु करताना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करत आहेत. महापालिकेची बससेवा सुरु करण्यास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत.
-राजेंद्र पाटील, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -