घरक्राइमपाचशे रुपयांची लाच घेताना लिपिकास अटक

पाचशे रुपयांची लाच घेताना लिपिकास अटक

Subscribe

नातीचा जन्माचा दाखला देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्विकारताना लाचपुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२९) नाशिक महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील कनिष्ठ लिपिकास अटक केली. प्रेमलता प्रेमचंद कदम (वय ५४, रा.नाशिक) असे अटक केलेल्या नाशिक महापालिकेतील जन्म मृत्यू विभाग, पश्चिममधील वरिष्ठ लिपिकचे नाव आहे.
नातीचा जन्माचा दाखला तयार करुन देण्यासाठी कदम यांनी ५६ वर्षीय तक्रारदाराकडे गुरुवारी (दि.२९) पाचशे रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच घेताना पथकाने कदम यांना अटक केली.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -